IND vs AUS 3rd Test | ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने रचला इतिहास; मुथय्या मुरलीधरनचा मोडला ‘तो’ विक्रम

पोलीसनामा ऑनलाईन टीम : IND vs AUS 3rd Test | सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना इंदोरमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने टीम इंडियाविरुद्ध इतिहास रचला आहे. हा इतिहास रचताना त्याने श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडला आहे.नॅथन लायनच्या खात्यात भारताविरुद्ध 108 विकेट्स जमा झाल्या आहेत. तो टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज बनला आहे. त्याच्या अगोदर हा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. त्याने भारताविरुद्ध 105 विकेट्स घेतल्या होत्या.

भारताविरुद्ध सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू खालीलप्रमाणे

नॅथन लायन – 108*
मुथय्या मुरलीधरन – 105
लान्स गिब्स – 63
डेरेक अंडरवुड – 62

तसेच भारताविरुद्ध वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास या यादीमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावावर 139 विकेट्स आहेत. (IND vs AUS 3rd Test)

भारताविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज खालीलप्रमाणे

जेम्स अँडरसन – 139
नॅथन लिऑन – 108*
मुथय्या मुरलीधरन – 105
इम्रान खान – 94
माल्कम मार्शल – 76

या सामन्यात भारताचा पहिला डाव 109 धावांवर संपुष्टात आला आहे.
तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर संपुष्टात आला आहे.
भारताने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. यामध्ये टीम इंडियाने 7 बाद 145 धावा केल्या आहेत. या डावात भारताची आघाडीची फळी संपूर्ण अपयशी ठरली आहे. मात्र चेतेश्वर पुजारा एका बाजूने खिंड लढवत आहे. सध्या चेतेश्वर पुजारा (52) आणि अक्षर पटेल (4) धावांवर खेळत आहे.

Web Title :- IND vs AUS 3rd Test | nathan lyon breaks muttiah muralitharans record to become the highest wicket taker spinner against india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chinchwad Bypoll Election | बंडखोरी झाली नसती तर विजय आमचाच होता, निकालानंतर नाना काटेंची प्रतिक्रिया

RMD Foundation Blood Donation Camp | रसिकलाल धारीवाल यांचा जन्मदिन रक्तदान शिबीराने साजरा; 561 रक्तदात्यांनी केले रक्तदान

Pune Chinchwad Bypoll Election | अश्विनी जगताप यांनी चिंचवडचा गड राखला, राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका