IND vs AUS 4th Test | अहमदाबाद कसोटीत फिरकीपटू आर.अश्विनने माजी खेळाडू अनिल कुंबळेचा मोडला ‘तो’ रेकॉर्ड

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 4th Test) यांच्यात अहमदाबादमध्ये मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर एक मोठे आव्हान ठेवत सामन्यावर आपली पकड निर्माण केली आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी खूप महत्वाचा आहे. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनने 6 विकेट घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडला आहे. (IND vs AUS 4th Test)

काय आहे तो विक्रम?
या सामन्यात 6 विकेट घेत आर. अश्विनने माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचा एक रेकॉर्ड मोडला आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 111 विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळे हा दुसऱ्या स्थानावर होता. आता अश्विनने त्यांचा रेकॉर्ड मोडून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. अश्विनचे आजच्या सामन्यातील 6 विकेट पकडून बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये एकूण 113 विकेट्स झाले आहेत.ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 113 विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विनने या मालिकेत 24 विकेट घेतल्या
आर अश्विनने आतापर्यंत या मालिकेत 24 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याने नागपूर कसोटीत 8 विकेट, दिल्लीत 6 आणि इंदूरमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत, तर आता अहमदाबाद कसोटीत 6 विकेट्स घेतल्या आहेत. (IND vs AUS 4th Test)

उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनने मोडला 63 वर्ष जुना विक्रम
उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी भारतात 208 धावांची भागीदारी करून 63 वर्षांपूर्वीचा एक जुना
विक्रम मोडीत काढला आहे. आजच्याच दिवशी 63 वर्षांपूर्वी नॉर्म ओ’नील आणि नील हार्वे या जोडीने
मुंबईमध्ये भारताविरुद्ध 207 धावांची भागीदारी केली होती. आता 63 वर्षांनंतर ग्रीन-ख्वाजा यांनी 208
धावांची भागीदारी करून का मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

Web Title :  IND vs AUS 4th Test | r ashwin equals anil kumbles record to become second highest wicket taker in border gavaskar trophy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Caste Issue | खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली? राज्य सरकारने केला खुलासा

Maharashtra Budget Session | सांगलीतील ‘जात’ प्रकारावरुन विधानसभेत खडाजंगी, मविआच्या आक्रमक नेत्यांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल : ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास आमचा विरोध – खासदार सुप्रिया सुळे