IND vs AUS 4th Test | उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनने रचला इतिहास; 63 वर्षांपूर्वीचा मोडला तो विक्रम

पोलीसनामा ऑनलाईन : IND vs AUS 4th Test | सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी 208 धावांची भागीदारी करून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
63 वर्षांपूर्वीचा मोडला तो विक्रम
उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी भारतात 208 धावांची भागीदारी करून 63 वर्षांपूर्वीचा एक जुना विक्रम मोडीत काढला आहे. आजच्याच दिवशी 63 वर्षांपूर्वी नॉर्म ओ’नील आणि नील हार्वे या जोडीने मुंबईमध्ये भारताविरुद्ध 207 धावांची भागीदारी केली होती. आता 63 वर्षांनंतर ग्रीन-ख्वाजा यांनी 208 धावांची भागीदारी करून का मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
What a moment for 23-year-old Cameron Green 🤩#WTC23 | #INDvAUS pic.twitter.com/BqzN5tLWff
— ICC (@ICC) March 10, 2023
किम ह्युजेस आणि अॅलन बॉर्डरच्या नावावर सर्वात मोठी भागीदारी
भारतातील कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम किम ह्युजेस आणि अॅलन बॉर्डर यांच्या नावावर आहे. त्यांनी 1979-80 मध्ये चेन्नई येथे 222 धावांची भागीदारी करून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता.
भारतात ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी भागीदारी
222 किम ह्युजेस – अॅलन बॉर्डर, चेन्नई 1979-80
208 उस्मान ख्वाजा – कॅमेरून ग्रीन, अहमदाबाद 2022-23
207 नॉर्म ओ’नील – नील हार्वे, मुंबई 1959-60
2013 पासून भारताविरुद्ध 200 पेक्षा अधिक भागीदारी
200 डी सिबली – जो रूट, चेन्नई 2021
208 उस्मान ख्वाजा – कॅमेरून ग्रीन, अहमदाबाद 2023
Web Title : IND vs AUS 4th Test | usman khawaja and cameron green partnership broke the record 63 years ago in ind vs aus 4th test
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sangli Caste Issue | खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली? राज्य सरकारने केला खुलासा