Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावात संपुष्टात

सिडनी : स्टिव्ह स्मिथच्या (Steve Smith) १३१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर संपुष्टात आला. एक बाजू लावून धरणारा स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) रवींद्र जडेजाच्या एका अचूक थ्रोमुळे शेवटी धाव बाद झाला.

रवींद्र जडेजा याने ६२ धावा देऊन ४ विकेट घेतल्या. बुमराह याने ६६ धावा देऊन २ बळी मिळविले. नवदीप सैनी याने २ गडी बाद केले. तर सिराज याला एक विकेट मिळाली.

स्टिव्ह स्मिथ याने आपले २७ वे शतक पूर्ण करतानाच ऑस्ट्रेलियाला ३०० धावांचा टप्पा पार करुन दिला होता. हेजलवूड याच्याबरोबर शेवटी खेळत असताना खेळी आपल्याकडे ठेवण्यासाठी स्मिथ याने दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीमा रेषेवरुन धावत येऊन जडेजा यांनी अचूकपणे विकेटवर थेट थ्रो करुन स्मिथला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला.