
IND vs AUS | ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का ! ‘हे’ दोन मॅचविनर खेळाडू टीममधून बाहेर
पोलीसनामा ऑनलाईन : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरु आहे. या मालिकेतील 2 सामने झाले असून तिसरा सामना 1 मार्च रोजी होणार आहे. या सामन्याच्या अगोदर ऑस्ट्रेलियाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया टीमचा कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणास्तव मायदेशी परतणार आहे. तर स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हे दोघेजण दुखापतीमुळे पुढील दोन्ही कसोटी सामन्यांना मुकणार आहेत. हे दोन्ही खेळाडू कर्णधार पॅट कमिन्ससोबत ऑस्ट्रेलियाला (IND vs AUS) रवाना होणार आहेत. पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतात परतेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीला 1 मार्चपासून सुरुवात होणार आहे. कुटुंबातील सदस्य गंभीर आजारी असल्याने कमिन्स ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. तर तो तिसर्या कसोटीपूर्वी परतला नाही, तर स्टीव्ह स्मिथकडे संघाचे नेतृत्व देण्यात येणार आहे. डेव्हिड वॉर्नर आणि जोश हेजलवूड या दोघांना गंभीर दुखापत झाल्याने ते उर्वरित कसोटी मालिकेला (IND vs AUS) मुकणार आहेत.
वॉर्नरला दुसऱ्या कसोटीदरम्यान पहिल्या डावात मोहम्मद सिराजच्या चेंडूवर त्याच्या डोक्याला आणि कोपराला मार लागला होता. त्यामुळे त्याच्या जागी मॅट रेनशॉला खेळवण्यात आले होते.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने या मालिकेत एकही सामना खेळला नाही.
मालिकेपूर्वीच तो जखमी झाला होता. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला आहे.
या दोन्ही कसोटीमध्ये टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला आहे. संघातील स्टार खेळाडूंच्या दुखापतीचा मोठा फटका ऑस्ट्रेलियाच्या संघाला बसत आहे.
Web Title :- IND vs AUS | Big shock to Australia! ‘These’ two match-winners out of the team
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bela Bose Passed Away | ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे निधन