
Ind vs Aus CWC Final | मिचेल मार्शचं ‘ते’ भाकित खरं ठरणार की खोटं, सोशल मीडियावर तुफान चर्चा, उद्याच्या सामन्याची उत्सुकता शिगेला!
मुंबई : उद्या भारत व ऑस्ट्रेलिया विश्वचषकाचा अंतिम सामना (Ind vs Aus CWC Final) अहमदाबाद येथे होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले असताना क्रिडासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ निकालावर भाष्य करत आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिचेल मार्शने (Australia Cricketer Mitchell Marsh) वर्तवलेलं एक भाकित सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. (Ind vs Aus CWC Final)
विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा होईल, हे भाकित दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) एका पॉडकास्टमध्ये मिचेल मार्शने सहा महिन्यापूर्वीच वर्तवले होते. ते खरे ठरल्यामुळे सध्या व्हायरल होत असलेल्या भाकिताला महत्व प्राप्त झाले आहे.
परंतु, भारताची कामगिरी पाहता मिचेल मार्शने वर्तवलेले हे भाकित खोटे ठरेल, असे चाहते म्हणत आहेत. मार्शने भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होईल असे म्हटले होते. पण त्याचबरोबर या सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिली फलंदाजी करताना फक्त २ बाद ४५० धावा करेल. संपूर्ण भारतीय संघ ६५ धावांवर सर्वबाद होईल आणि ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत अजेय राहून विश्वचषक जिंकेल, असेही मार्शने भाकितामध्ये म्हटले होते.
मात्र, भारतीय संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अजेय राहिला आहे. भारताने पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव केला.
भारतीय फलंदाजांची व गोलंदाजांची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिल्याने भारताच्या २ बाद ४५० धावा व
ऑस्ट्रेलिया ६५ वर सर्वबाद होईल अशी प्रतिक्रिया चाहते सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
उद्या काय होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
जरांगेंचा भुजबळांविषयी गौप्यस्फोट! मग अजितदादांना कुठं पाठवतो? फडणवीसांचं काय?