IND Vs AUS : दुसर्‍या कसोटी सामन्यात ‘हे’ 4 भारतीय खेळाडू बाहेर असणे जवळपास निश्चित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात तिसर्‍याच दिवशी ऑस्ट्रेलियालाकडून मिळालेल्या 8 विकेटच्या पराभवानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाला त्यांच्या निवड प्रक्रियेचा पुन्हा विचार करावा लागेल. पहिल्या कसोटीत काही खेळाडूंच्या निवडीच्या वेळी संघ व्यवस्थापनाने डोळ्यावर कदाचित पट्टी बांंधली असावी, म्हणूनच पहिल्या कसोटीत संघातील प्लेइंग इलेव्हनचा भाग असावा, अशा खेळाडूंची उत्तम कामगिरी त्याला दिसली नाही. यासाठीच भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल करण्यात येणार आहे, जे मेलबर्नमधील दुसर्‍या कसोटी सामन्यात पाहता येतील ….

पृथ्वी शॉ

पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डाव फलंदाजीसह फ्लॉप झाला आणि डावखुरा सलामीवीर पृथ्वी शॉ जेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडला गेला तेव्हापासून व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात होते. पहिल्या डावात 0 आणि दुसऱ्या डावात 4 धावा करणारा शॉ ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर प्रभावी ठरला नाही.

हनुमा विहारी

पहिल्या कसोटीत फलंदाजीसह काही खास कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या आणि दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण दरम्यान जखमी झालेल्या हनुमा विहारीच्या खेळावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 16 आणि दुसऱ्या डावात 8 धावा करणारा विहारी सराव सामन्यात जास्त कामगिरी करू शकला नाही.

विराट कोहली

भारतीय कर्णधार आणि महत्त्वपूर्ण फलंदाज विराट कोहलीला कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतावे लागणार आहे. त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या गर्भवती आहेत. जानेवारी महिन्यात विराट आणि अनुष्का पालक बनण्याची शक्यता आहे.

मोहम्मद शमी

पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला. सामन्याच्या एका टप्प्यावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर झगडत होता आणि 36 धावांत 9 गडी गमावत होता. त्याचवेळी मैदानावर फलंदाजी करणार्‍या खालच्या फळीतील फलंदाज आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला फलंदाजी करताना दुखापत झाली.