IND Vs AUS : तिसर्‍या टेस्टसाठी टीम इंडियाने केली Playing 11 ची घोषणा, नवदीप सैनी करणार डेब्यू

नवी दिल्ली : 7 जानेवारीपासून सिडनीत खेळल्या जाणार्‍या तिसर्‍या टेस्ट मॅचसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची (Team India ) घोषणा केली आहे. तिसर्‍या टेस्टमध्ये टीम इंडिया (Team India ) दोन बदलांसह मैदानात उतरेल. स्टार ओपनर रोहित शर्मा परतला आहे. तसेच नवदीप सैनीला तिसर्‍या टेस्टमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळेल. दोन टेस्टमध्ये खराब कामगिरी करणारा ओपनर मयंक अग्रवाल यास बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

रोहित शर्माच्या परतीचा अंदाज अगोदरपासूनच वर्तवला जात होता. मात्र, हे स्पष्ट नव्हते की, रोहित शर्मा मयंक अग्रवालची जागा घेणार की, हनुमा विहारीची. परंतु इंडियाने विहारीला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

उमेश यादवला दुखापत झाल्याने टीम इंडियासाठी आणखी एक बदल करणे भाग पडले होते. नवदीप सैनीला टीम इंडियाने डेब्यू करण्याची संधी दिली आहे. नवदीप सैनी तिसर्‍या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजची साथ देईल.

फिरकी गोलंदाजीची जबाबदारी या सीरीजमध्ये शानदार फॉर्म दाखवणार्‍या आर अश्विनकडे राहणार आहे. रवींद्र जडेजाने पहिल्या टेस्टमध्ये 57 धावांच्या खेळीसह ऑलराउंडर म्हणून टीममध्ये स्थान पक्के केले आहे.

तिसर्‍या टेस्टमध्ये नटराजनच्या डेब्यूबाबत खुप चर्चा होती. असा अंदाज वर्तवला जात होता की, सैनीच्या ऐवजी टी नटराजनला डेब्यूची संधी मिळेल. परंतु, असे झाले नाही, यामुळे नटराजनला आता टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागेल.

Playing 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे (कर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी