IND Vs AUS T-20 | दिनेश कार्तिकनं जिंकूण देताच रोहित शर्मा आनंदानं…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – IND Vs AUS T-20 | सध्या टीम इंडिया (India) आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia) यांच्यात T- 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये (Mohali) खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या त्या सामन्यावेळी नाराज झालेल्या कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दिनेश कार्तिकची (Dinesh Kartik) मान पकडली होती. हे जरी रोहितने गंमतीत केले असले तरी रोहितची नाराजी दिसून येत होती. (IND Vs AUS T-20)

आता रोहित आणि डीकेचे दुसऱ्या टी-20 सामन्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दुसऱ्या T- 20मध्ये विजय मिळवल्यानंतर हिटमॅन रोहित मान पकडण्या ऐवजी फिनिशर डीकेला मिठी मारताना दिसत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज एका बाजूने सातत्याने बाद होत होते. मात्र, रोहित एकटा दुसऱ्या बाजूने खिंड लढवत होता. यावेळी अखेरच्या षटकात 9 धावांची आवश्यकता होती. यावेळी नवा फलंदाज असलेल्या दिनेश कार्तिकने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत, केवळ देनच चेंडूंत भारताला विजय मिळवून दिला. (IND Vs AUS T-20)

 

या सामन्यात रोहितने नाबाद 46 केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
कार्तिकने 2 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 10 धावा केल्या.
भारताने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. या विजयाबरोबरच भारताने या मालिकेत1-1 अशी बरोबरी केली आहे.

 

Web Title :- IND Vs AUS T-20 | india vs australia rohit sharma gives special hug to dinesh karthik after winning nagpur t20 match

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | विश्वास संपादन करुन 22 लाख रुपये चोरुन नेणार्‍या महाराजाला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Dasara Melava 2022  | शिवाजी पार्कवर ‘हसरा मेळावा’, भाजपने उडवली उद्धव ठाकरे यांची खिल्ली

Pune News | धक्कादायक ! पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी (व्हिडिओ)