IND vs AUS Test Series | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाने ‘या’ 3 खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

पोलीसनामा ऑनलाईन : IND vs AUS Test Series | आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघातील मालिकेला लवकरच सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरमध्ये होणार आहे. दोन्ही देशांमधील कसोटी मालिका तब्बल सहा वर्षानंतर मायदेशात खेळवली जात आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघातून तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. (IND vs AUS Test Series)

भारतासाठी ही कसोटी मालिका सर्वात महत्वाची आहे. कारण ही मालिका जर भारताने जिंकली तर त्यांना विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचता येणार आहे. त्यामुळे भारताने या कसोटी मालिकेत मोठे बदल केले आहेत. भारताने आपल्या संघात चार नेट बॉलर्सला स्थान दिले आहे तर तीन खेळाडूंना वगळण्यात आले आहे. वगळण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये शार्दूल ठाकूर, अभिमन्यू इश्वरन आणि सौरभ कुमार यांचा समावेश आहे. (IND vs AUS Test Series)

शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर हा बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघात होता. शार्दुल हा एक चांगला पर्याय भारतीय संघासाठी आहे. कारण शार्दुल हा वेगवान गोलंदाज आहेच, पण त्याचा उपयोग हा एखादी प्रतिस्पर्धी संघाची जोडी जमली असेल तर ती फोडण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर शार्दुल हा उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे एक दमदार अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दुलकडे पाहिले जाते. पण या मालिकेत मात्र त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.

अभिमन्यू इश्वरन

बांगलादेशमध्ये कसोटी मालिकेत रोहित शर्मा खेळू शकला नव्हता त्यामुळे त्याच्या जागी अभिमन्यू इश्वरनला स्थान देण्यात आले होते. मात्र त्याला एकही सामना न खेळवता संघाबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सौरभ कुमार

भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळे त्याच्या जागी भारतीय संघात सौरभ कुमारला न देण्यात आले होते. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता जडेजा संघात परतला आहे, नागपूर कसोटीमध्ये तो खेळताना दिसणार आहे त्यामुळे सौरभ कुमारला निवड समितीने संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, सकाळी 9.30, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, सकाळी 9.30, दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, सकाळी 9.30, धर्मशाळा
चौथी कसोटी, 9-13 मार्च, सकाळी 9.30, अहमदाबाद

टीम इंडियाचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर,
केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकॉम्ब,
ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ,
मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.

Web Title :- IND vs AUS Test Series | major changes in the indian cricket team ahead of the series against australia three players are shown the way out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nysa Devgan | लाल रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये न्यासा दिसते एकदम हॉट

Imran Khan | आमिर खानचा भाचा इम्रान पत्नीपासून विभक्त झाल्यावर ‘या’ अभिनेत्रीला करत आहे डेट; व्हिडिओ व्हायरल

Pune Kasba-Chinchwad Bypoll Election | कसबा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांना साद; म्हणाले…