Ind Vs Aus : 1046 विरुद्ध 13 असा हा सामना

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था – कोणत्याही संघात फलदांज कितीही तगडे असले तरी त्या संघाकडे विरुद्ध संघांच्या खेळाडुच्या २० बळी घेण्याची क्षमता गोलंदाजांकडे असेल तरच संघ कसोटी सामना जिंकु शकतो, हा कसोटी क्रिकेटमधील अधोरेखित झालेला नियम आहे. त्यादृष्टीने कसोटी संघातील गोलंदाजीचा विचार केला जातो. हे पाहता दुखापतीने त्रस्त असलेल्या भारतापुढे ब्रिस्बेनमध्ये मोठे आव्हान असणार आहे ते गोलंदाजीचे. ऑस्ट्रेलियन संघाच्या तुलनेत भारतीय गोलंदाजाची फळी अनुभवात फार कमी आहे. ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅशन लियॉन आणि जोश हेझलवूड असे अनुभवी गोलंदाज आहेत. या सर्वांनी एकूण ५०४ सामन्यात १ हजार ४६ विकेटस घेतल्या आहेत.

दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, टी नटराजन या गोलदांजांच्या नावावर केवळ १३ विकेटस आहेत. २०१५ नंतर टीम इंडियाने मैदानात उतरविलेल्या अंतिम ११ मध्ये आताची गोलंदाजांची फळी ही सर्वात कमी अनुभव असलेली आहे. त्यामुळे हा सामना १०४६ विरुद्ध १३ असा असणार आहे. त्यातील टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर हे दोघे तर पहिलीच कसोटी खेळत आहेत. एकाच दौºयावर वन डे, टष्ट्वेंटी – २० आणि कसोटी संघात पर्दापण करणारा टी नटराजन हा पहिलाच भारतीय खेळाडु ठरला आहे. एकाच सत्रात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा भुवनेश्वर कुमार (२०१२ -१३) याच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे. वॉशिंग्टन सुंदरही टीम इंडियाकडून तीनही फॉरमॅटमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये पर्दापण करणारा सर्वात कमी वयाचा तिसरा खेळाडु ठरला आहे.या ऑस्ट्रेलिया दौºयात भारतीय संघातून तब्बल २० खेळाडु खेळले आहेत.

एकाच मालिकेत इतके खेळाडु खेळण्याचा हा ६० वर्षानंतरचा पहिलाच प्रसंग आहे. पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघातून १९६० मध्ये मालिकेत २० खेळाडु खेळले होते. त्या विक्रमाची बरोबर या संघाने केली आहे. परिस्थिती भारताविरुद्ध अनुभवाने कमी असलेल्या खेळाडुंबरोबरच स्थानिक परिस्थितीही भारताच्या विरुद्ध आहे. गॅबाची खेळपट्टी ही अतिशय वेगवान समजली जाते. १९८८मध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा या मैदानावर पराभव केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया येथे अपराजित राहिली आहे.

ऑस्ट्रेलियाने ३१ पैकी २४ कसोटी सामने जिंकले आहे. या मैदानावर भारताने खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात पराभव झाला आहे. २००३ मधील सामना अनिर्णित राहिला होता. हे सर्व पाहता या कसोटी सामन्यात सर्व बाबी भारताच्याविरोधात दिसत आहे. भारतीय क्षेत्ररक्षण या मालिकेत खराब झाले आहे. अनेक सोपे झेल सोडण्यात आले. भारतीय गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली तरच भारताला काही आशा बाळगता येणार आहे.