Ind Vs Aus | ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात अहमदाबाद येथे चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ओपनर बॅट्समन उस्मान ख्वाजाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी या अगोदर ऑस्ट्रेलियाच्या (Ind Vs Aus) कोणत्याच खेळाडूला जमलेली नाही. उस्मान ख्वाजा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये एका डावात 150 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

आशियामध्ये दुसऱ्यांदा 150+ स्कोअर
उस्मान ख्वाजाने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 5व्यांदा 150 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच आशिया खंडात दुसऱ्यांदा त्याने हि कामगिरी केली आहे. मागच्या वर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीत 160 धावांची खेळी केली होती. मात्र त्याला अजून एकदाही द्विशतक झळकावता आलेले नाही. सध्या भारताबरोबर सुरु असलेल्या कसोटीमध्ये तो 180 धावांवर खेळत आहे. तो भारताविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकवतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Ind Vs Aus)

उस्मान ख्वाजाचा नावे मोठा विक्रम
सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा ख्वाजा हा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. 2001 मध्ये मॅथ्यू हेडननंतर 150 किंवा त्याहून अधिक धावा करणारा उस्मान ख्वाजा पहिला ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला आहे. भारतातील कसोटीत 150 धावांचा टप्पा पार करणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला आहे. भारताविरुद्ध सर्वात मोठी खेळी करण्याच्या विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनच्या नावावर आहे. त्याने 2001 मध्ये चेन्नईमध्ये भारताविरुद्ध 203 धावा केल्या होत्या.

भारतात 150 हून अधिक धावसंख्या करणारे ऑस्ट्रेलियन सलामवीर
जिम बर्क – 1956 मध्ये ब्रेबॉर्न येथे 161 धावा
ग्रॅहम यॅलॉप – 1979 मध्ये ईडन गार्डन्स येथे 167 धावा
मॅथ्यू हेडन – 2001 मध्ये चेन्नईमध्ये 203 धावा
उस्मान ख्वाजा – 2023 मध्ये अहमदाबादमध्ये नाबाद 180* धावा

Web Title : Ind Vs Aus | usman khwaja becomes 3rd to score 150 score multiple times for australia know the details ind vs aus bgt 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Caste Issue | खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली? राज्य सरकारने केला खुलासा

Maharashtra Budget Session | सांगलीतील ‘जात’ प्रकारावरुन विधानसभेत खडाजंगी, मविआच्या आक्रमक नेत्यांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल : ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास आमचा विरोध – खासदार सुप्रिया सुळे