IND vs AUS | ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करून विराट कोहलीने केला ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज

पोलीसनामा ऑनलाईन टीम : IND vs AUS | सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराट कोहलीने दीर्घकाळानंतर शतक झळकावले आहे. या शतकासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने या सामन्यात शतक करून ब्रायन लाराचा रेकॉर्ड मोडला आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (IND vs AUS)

विराटने हा विक्रम करताना वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू ब्रायन लाराला मागे टाकले आहे. ब्रायन लाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 82 आंतरराष्ट्रीय सामने (कसोटी आणि एकदिवसीय) खेळले. यादरम्यान त्याने 12 शतकांच्या मदतीने 4714 धावा केल्या आहेत. तर कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 89 आंतरराष्ट्रीय (T20, ODI, कसोटी) सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 50.84 च्या सरासरीने 4700 हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 16 शतके, 23 अर्धशतकांचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 20 शतके आणि 31 अर्धशतकांच्या मदतीने 49.68 च्या सरासरीने 6707 धावा केल्या आहेत. (IND vs AUS)

जवळपास तीन वर्षानंतर ठोकलं शतक

विराट कोहलीने जवळपास 3 वर्षानंतर म्हणजे 1205 दिवसानंतर कसोटीमध्ये शतक ठोकले आहे.
याआधी त्याने अखेरचं कसोटी शतक बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं.
त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. मागच्या काही वर्षांपासून विराट कोहली आपल्या फॉर्म सुधारण्यासाठी झगडत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकल्यावर विराट पुन्हा फॉर्मात परतेल अशी विराटच्या चाहत्यांना आशा आहे.

Web Title :  IND vs AUS | virat kohli became highest run getter against australia after hitting century in ind vs aus 4th test

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vinay Aranha In ED Custody | विद्यार्थ्यांकडून भरमसाट फी घेणार्‍या विनय अरान्हाने उधळले बॉलीवूड स्टारवर पैसे; अनेक कारनामे ‘बाहेर’

Costa Titch Passes Away | दक्षिण आफ्रिकेचा लोकप्रिय गायक कोस्टा टिच याचे कॉन्सर्टदरम्यान निधन; वयाच्या 27 व्या वर्षी झाले निधन

Palghar Crime News | पालघरमध्ये पाण्याच्या वादावरून आरोपींकडून महिलांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण

Nandurbar Police | बंदुकीच्या धाकाने शेतकर्‍यांना लुटणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला नंदुरबार पोलिसांकडून 30 तासात अटक, 21 लाखाचा ऐवज जप्त

Ileana D’Cruz | इलियाना डिक्रुझला तमिळ सिनेसृष्टीतून केलं बॅन? समोर आले ‘हे’ कारण