IND VS AUS Womens T20 World Cup | भारताला मोठा धक्का ! पूजा वस्त्राकर सेमी फायनलमधून बाहेर

पोलीसनामा ऑनलाईन : IND VS AUS Womens T20 World Cup | सध्या दक्षिण आफ्रिकेत आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप सुरु आहे. आज या वर्ल्डकपमधील पहिला सेमीफायनलचा सामना पार पडणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना पार पडणार आहे. आज सायंकाळी 6.30 वाजता हा सामना पार पडणार आहे. मात्र या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. (IND VS AUS Womens T20 World Cup)

पूजा वस्त्राकर सेमी फायनलमधून बाहेर

भारताची स्टार गोलंदाज पूजा वस्त्राकर आजारपणामुळे सेमी फायनल सामन्यातून बाहेर पडली आहे. मागच्या काही दिवसांपासून पूजा ही आजारी होती. अखेर आज बीसीसीआयने याची अधिकृतरित्या माहिती दिली आहे. पूजा हिला अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे ती ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये खेळू शकणार नाही त्यामुळे तिच्या ऐवजी स्नेह राना हिला संघात स्थान देण्यात आले आहे.

फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर तब्बल पाच वेळा महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे
आव्हान आहे. हा सामना भारतीय महिला संघासाठी नक्कीच सोपा नसणार आहे.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अनुभवी गोलंदाज पूजा वस्त्रारकर या दोघींची तब्बेत बरी नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यामध्ये पूजा वस्त्रारकर खेळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे तर कर्णधार हरमनप्रीत कौरबाबत अजूनही साशंकता
आहे.
जर हरमनप्रीत कौर बाहेर पडली तर हा भारतासाठी सर्वात मोठा धक्का असेल.
कर्णधार हरमनप्रीत कौर सेमी फायनल खेळू शकली नाहीतर तर स्मृती मानधना ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचे नेतृत्व करेल.

Web Title :- IND VS AUS Womens T20 World Cup | womens t20 world cup harmnpreet kaur and pooja vastrakar unlikely to play in india vs australia semi final match

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | धक्कादायक ! आर्थिक विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

MPSC | नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, आयोगाकडून विद्यार्थ्यांची मागणी मान्य

Pune Kasba Peth Bypoll Election | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांचा आणि त्यांच्या कुटूंबियांचा भाजप उमेदवार हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा