IND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला; व्हाइट वॉशपासून बचावाण्यासाठी करावे लागेल प्रयत्न

पोलीसनामा ऑनलाइन : IND vs BAN 3rd ODI | सध्या भारत बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत 3 वनडे आणि 2 कसोटी मालिका खेळणार आहे. अगोदरच बांगलादेशने वनडे मालिकेतील 2 सामने जिंकून सीरिज आपल्या खिशात घातली आहे. आज या सीरिजमधला तिसरा आणि शेवटचा सामना पार पडणार आहे. व्हाइट वॉशपासून वाचण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरू होणार आहे.

या सामन्याच्या अगोदर भारताला मोठे धक्के बसले आहेत. दुसऱ्या सामन्यात दुखापत झाल्याने कर्णधार रोहित शर्मा मालिकेतून बाहेर पडला आहे. कॅच घेताना रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. तो मुंबईला परतला आहे. त्यामुळे आता रोहित शर्माच्या अनुपस्थित केएल राहुल तिसऱ्या वनडेत कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. रोहित शर्माबरोबर दीपक चहर आणि कुलदीप सेनदेखील दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडले आहेत. (IND vs BAN 3rd ODI)

तिसरा सामना हरला तर प्रथमच क्लीन स्वीप मिळणार

पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच, तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाची स्थिती खराब झाली आणि त्यांनी
तिसरा सामनादेखील गमावला तर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध नकोसा लाजिरवाणा विक्रम करेल.
भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यातील ही पाचवी द्विपक्षीय वनडे मालिका आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत 5 पैकी 2 द्विपक्षीय वनडे मालिका गमावल्या आहेत.

Web Title :-  IND vs BAN 3rd ODI | ind vs ban series third odi match between india and bangladesh will be play today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Leader Ajit Pawar | ‘अरे गोपीचंदा काय बोलतो’ असे म्हणत पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवारांची टोलेबाजी; अनेक मुद्द्यांवर मांडले मत

Mumbai Crime | देवाचा प्रसाद देतो असे सांगून 60 वर्षीय वृद्धाने केला 11 वर्षीय मुलीवर बलात्कार