IND vs BAN Test | भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ ‘हा’ खेळाडू होऊ शकतो संघाबाहेर

पोलीसनामा ऑनलाईन : IND vs BAN Test | भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हा सामना चट्टोग्राम या ठिकाणी होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल् हसनला (Shakib Al Hasan) दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जर त्याची दुखापत गंभीर असेल तर त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागू शकते, ज्यामुळे बांगलादेश संघाच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. (IND vs BAN Test)

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी, शाकीब चट्टोग्रामच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सरावासठी पोहोचला असता त्याला दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘दुखापत जास्त गंभीर नाही, परंतु वाहतुकीचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने शाकिबला
रुग्णवाहिकेने पाठवण्यात आले असल्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
कसोटी मालिकेत शाकिब खेळणार की नाही याबाबत कोणतीही माहिती अद्याप संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आलेली नाही.
(IND vs BAN Test)

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर,
ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर,
मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ –

शाकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नुरुल हसन,
इबत हुसेन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन,
मुशफिकर रहिम , तस्किन अहमद, रेहमान रझा, अनामूल हक.

Web Title :- IND vs BAN Test | big blow for team bangladesh shakib al hasan taken to hospital due to injury before india vs bangladesh test

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Leader Tanaji Patil | सांगलीतील शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी; ईडीमध्ये तक्रार दाखल

Pune Pimpri Crime | लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, गर्भपात करण्यासाठी दिली 24 तुकडे करण्याची धमकी; वाकड मधील धक्कादायक प्रकार