IND vs BAN Test | भारताचे ‘हे’ 3 खेळाडू रचू शकतात इतिहास; व्हाईस कॅप्टन चेतेश्वर पुजाराही समावेश

पोलीसनामा ऑनलाईन : IND vs BAN Test | भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हा सामना चट्टोग्राम या ठिकाणी होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर पडल्याने के एल राहुल या सामन्याचे नेतृत्व करणार आहे तर चेतेश्वर पुजारा उपकर्णधारपद भूषवणार आहे. रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा या तिघांसाठी ही सीरिज खूप विशेष असणार आहे. हे तिघेही या सिरीजमध्ये नवीन रेकॉर्ड करू शकतात. (IND vs BAN Test)

काय आहे ते रेकॉर्ड?

1) चेतेश्वर पुजारा : चेतेश्वर पुजारा हा या सामन्यात सात हजार रन्सचा टप्पा पार करू शकतो. चेतेश्वर पुजारा टेस्ट क्रिकेटमध्ये सात हजार रन्सच्या अगदी जवळ पोहोचला आहे. जर त्याने बांगलादेशविरुद्ध चार इनिंगमध्ये 209 रन्स केले, तर तो हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. पुजाराने आतापर्यंत 96 टेस्ट क्रिकेट मॅचेसमधील 164 इनिंगमध्ये 43.81च्या सरासरीनं 6792 रन्स केले आहेत. (IND vs BAN Test)

2) आर. अश्विन : बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जलद 450 विकेट्स घेणारा दुसरा स्पिन बॉलर ठरू शकतो. 450 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आठ विकेट्सची आवश्यकता आहे. जर त्याने बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट मॅचेसमध्ये आठ विकेट्स घेतल्या, तर तो 450 हून अधिक टेस्ट विकेट्स घेणारा दुसरा भारतीय आणि जगातला नववा बॉलर ठरेल. सध्या त्याने 86 टेस्ट मॅचेसमधील 162 डावांमध्ये 442 विकेट्स घेतल्या आहेत.

3) ऋषभ पंत : चेतेश्वर पुजारा आणि आर. अश्विननंतर ऋषभ पंतदेखील टेस्ट क्रिकेटमध्ये एक विक्रम करण्याच्या तयारीत आहे. टेस्ट क्रिकेटमधल्या वैयक्तिक 50 व्या सिक्सपासून दोन पावले मागे आहे.
जर त्याने बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट क्रिकेटमध्ये दोन सिक्सर्स मारले, तर तो वीरेंद्र सेहवाग, एम. एस. धोनी,
सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, कपिल देव, सौरव गांगुली आणि रवींद्र जडेजा यांच्यानंतर अशी कामगिरी
करणारा भारताचा आठवा खेळाडू ठरेल. तसेच त्याने 25 रन्स केल्या तर तो चार हजार रन्सही पूर्ण करेल.

भारत – बांगलादेश टेस्ट रेकॉर्ड
भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या 22 वर्षांत आतापर्यंत 11 टेस्ट मॅचेस झाल्या आहेत.
त्यांपैकी भारताने नऊ मॅचेस जिंकल्या आहेत आणि दोन मॅच ड्रॉ झाल्या आहेत.
म्हणजेच बांगलादेशने भारताविरुद्ध आतापर्यंत एकही टेस्ट मॅच जिंकलेली नाही.
नुकतीच भारत- बांगलादेश यांच्यात वनडे सिरीज पार पडली होती. ती बांगलादेशने 2-1 ने जिंकली होती.
त्यामुळे आता बांगलादेश कसोटी मालिका जिंकून इतिहास रचणर कि भारत आपला रेकॉर्ड कायम ठेवणार हे
पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :- IND vs BAN Test | ind vs ban test series ashwin rishabh pant and pujara eye on big record against bangladesh cricket news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Patan Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या तरूणावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल