IND Vs BAN Test | बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

पोलीसनामा ऑनलाइन टीम : IND Vs BAN Test | बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालकेतील पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा हे खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे. (IND Vs BAN Test)
बीसीसीआय़ने बांगलादेश विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल केले आहेत. कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जखमी झाल्यामुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. यामुळे रोहित शर्माच्या जागी केएल राहुल कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे.
या संघात रोहित शर्माच्या जागी इंडिया ए संघाचा कर्णधार अभिमन्यू इश्वरनचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच मोहम्मद शमीच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी जयदेव उनाटकट, तर जडेजाच्या जागी सौरभ कुमारला संघात स्थान देण्यात आलं आहे.
बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत,
केएस भारत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव,
अभिमन्यू इश्वरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार आणि जयदेव उनाटकट.
Web Title :- IND Vs BAN Test | rohit sharma ruled out from team india for first test against bangladesh
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Wardha Crime | धक्कादायक! वर्ध्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा संशयास्पद मृतदेह
Pune Crime | हॉटेलमध्ये राडा घालत केली गाड्यांची तोडफोड; वारजे परिसरातील घटना
Pune Rickshaw Strike | आज पुन्हा रिक्षाचे आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलनाची हाक