IND vs ENG, 1st ODI : …अन् कृणाल पांड्या ढसाढसा रडू लागला

पोलीसनामा ऑनलाईन टीम – टी-२० मालिकेत एक मॅच खेळवून बाहेर बसवलेल्या फलंदाज शिखर धवनने वन-डे मालिकेतील पहिल्याच मॅचमध्ये दमदार खेळी केली आहे. प्रारंभी खेळणारा रोहित शर्मा सोबत अर्धशतकी, आणि इंडिया कॅप्टन विराट कोहली याच्यासोबत शतकी भागीदारी करताना शिखर धवनने संघाच्या धावांचा वेग कायम ठेवला होता. धवनला १०६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९८ धावांवर पराभव पत्करावा लागला. शेवटच्या १० षटकांत कृणाल पांड्या आणि लोकेश राहुल यांनी फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतकासह ६१ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी (Partnership) केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या.

कृणालपाठोपाठ लोकेशनेही अर्धशतक पूर्ण केले. कृणाल ३१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांवर, तर लोकेश ४३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. मॅचनंतर कृणाल पांड्या जेव्हा चर्चेला आला तेव्हा तो ढसाढसा रडू लागला. तर पदार्पणाची कॅप हाती घेतल्यानंतर कृणालनं सर्वप्रथम हार्दिक पांड्याला मिठी मारली आणि वडिलांना आठवत त्यानं ती आकाशाच्या दिशेनं फडकावली. पदार्पणात अर्धशतक झळकावून त्यानं वडिलांना श्रद्धांजली वाहिली. काही महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.

रोहित शर्मा व शिखर धवन यांनी भारतीय संघाला सावध प्रारंभ करून दिला. १६ व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर बेन स्टोक्सनं ही ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. रोहित ४२ चेंडूंत ४ चौकरांसह २८ धावा केल्या. तर विराट कोहली ६० चेंडूंत ५६ धावा करून बॅड झाला. श्रेयस अय्यरही ( ६) वूडच्या गोलंदाजीवर बॅड झाला. बेन स्टोक्सनं भारतीय संघाला मोठे धक्के दिले. रोहित, धवन आणि हार्दिक पांड्या ( १) यांना त्यानं आउट केलं आहे. तसेच पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कृणाल पांड्या आणि अपयशी ठरूनही कर्णधाकडून सातत्यानं संधी मिळवणाऱ्या लोकेश राहुलनं अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. या दोघांनी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कृणालनं अवघ्या २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पदार्पणाच्या सामन्यातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. त्याच्या या खेळीत ६ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.

दरम्यान, १६ जानेवारीला हार्दिक व कृणाल यांचे वडील हिमांशू पांड्या यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झाले. त्यावेळी कृणाल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वें-20 स्पर्धेत खेळत होता आणि ही बातमी समजताच त्यानं बायो-बबल कवच सोडून तो घरी परतला होता.