IND Vs ENG : प्रेक्षकांशिवाय खेळला जाणार पहिला कसोटी सामना, दुसऱ्या सामन्यात 50 % प्रेक्षक घेऊ शकतात आनंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारत विरूद्ध इंग्लड क्रिकेट संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना ५ फेब्रुवारीपासून ९ फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार आहे. चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही संघामधील पहिला कसोटी सामना प्रेक्षकांशिवावय खेळला जाणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात ५० टक्के प्रेक्षक स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येऊ शकतात.

तसेच, भारत आणि इंगलंड मधील सीरिजचा दुसरा सामना देखील एम ए चिदंबरम स्टेडियमवर १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. त्याचवेळी या मालिकेचा तिसरा आणि चौथा सामना अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये खेळला जाईल. या दोन्ही सामन्यांच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नसल्या तरी २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी किंवा ४ ते ८ मार्च दरम्यान तिसरा आणि चौथा सामना खेळला जाण्याची शक्यता आहे.

माहितीनुसार, कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघा दरम्यान पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल. टी -२० मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. या एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियममध्ये खेळले जातील.