ICC च्या निर्णयावर प्रश्न उपस्थित, अंपायरच्या निर्णयामुळे पंतला 4 धावांचे नुकसान

पोलीसनामा ऑनलाईन टीम : इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात ऋषभ पंत आणि भारतीय संघाला अंपायरच्या निर्णयामुळे 4 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताच्या डावातील 40 व्या ओव्हर दरम्यान ऋषभ पंतने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टॉम कुरनच्या बॉलवर रिवर्स स्कूप खेळला. पण चेंडू बॅटच्या आतील बाजूूूला लागून बाउंड्री गेला.

या दरम्यान टॉम कुरनने अपील केले. अंपायर वीरेंद्र शर्माने पंतला LBW म्हटले. पंतने अंपायरच्या निर्णयाला आव्हान देत DRS घेण्याचे ठरविले. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, चेंडू बॅटला लागून गेला. थर्ड अंपायरने पंतला नॉट आउट दिले. पण पंतला चार धावा मिळाल्या नाही आणि बॉल डेड झाला.

आयसीसी नियम :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (ICC) नियमांनुसार, जर अंपायर एखाद्या चेंडूवर खेळाडूला आउट करतो, तर तो बॉल डेड होतो. मग त्यावर केलेल्या धावा वैध राहत नाही. मात्र, या घटनेनंतर पुन्हा एकदा माजी खेळाडूंनी आयसीसीच्या नियमाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अंपायरच्या चुकीमुळे ऋषभ पंतला चार धावा गमवाव्या लागल्याचे भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्राने सोशल मीडियावर लिहिले. याची पुनरावृत्ती लाखो वेळा झाली आहे. आकाश चोप्राने लिहिले की, वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात लक्ष्यचा पााठलाग करणाऱ्या संघासोबत असे होते आणि विजयासाठी 2 धावा करायच्या असतील. विचार करा, विचार करा…

दरम्यान, वन डे मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पंतने 40 चेंडूत तीन चौकार व सात षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. त्याने केएल राहुलबरोबर चौथ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली.