IND vs ENG Test : इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत; मालिका खिशात

अहमदाबाद : वृत्तसंस्था – अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम वर सुरु असलेल्या इंग्लंड – इंडिया मध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेमध्ये भारताने ३-१ असा विजय मिळवून हि मालिका खिशात घातली. रिषभ पंत व अक्षर पटेल यांच्यासह शतकी भागीदारी करणाऱ्या वॉशिंग्टननं टीम इंडियाला १६० धावांची आघाडी मिळवून दिली होती. इंग्लडच्या दुसऱ्या डावात भारताच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. भारताच्या आर अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजाने इंग्लंडचे फलंदाज बाद करत एकामागे एक जोरदार धक्के दिले. या सामन्यामध्ये अक्षर पटेलनं पुन्हा एकदा एका डावात ५ विकेट घेऊन इतिहास रचला आहे. इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांवर संपला. त्यानंतर टीम इंडियाने हा सामना एक डाव आणि २५ रन्सने हा विजय मिळवला. या सामन्यात आर अश्विन आणि अक्षर पटेल या गोलंदाजांनी प्रत्येकी ५-५ विकेट घेतल्या आहेत. हा सामना जिंकून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सामन्यातील काही महत्वाच्या घडामोडी
१) चौथ्या कसोटीमधील दुसरा दिवस रिषभ पंतने गाजवला होता.  रिषभ व वॉशिंग्टन यांनी सातव्या विकेटसाठी १५८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या. रिषभ ११८ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०१ धावांवर माघारी परतला.

२) भारताकडून प्रथमच सातव्या आणि आठव्या विकेटसाठी एकाच कसोटीत शतकी भागीदारी झाल्या. वॉशिंग्टन सुंदर-रिषभ पंत यांनी सातव्या विकेटसाठी ११३ तर वॉशिंग्टन – अक्षर पटेल १०६ ( १७९ चेंडू) यांनी शतकी भागीदारी केली.

३) वॉशिंग्टन १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ९६ धावांवर नाबाद राहिला. भारतानं पहिल्या डावात ३६५ धावा केल्या आणि १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं चार, जेम्स अँडरसननं तीन आणि जॅक लिचनं दोन विकेट्स घेतल्या.

४) पहिल्या चार कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये अक्षर पटेल दुसऱ्या स्थानी गेला आहे. यामध्ये त्याने अश्विनला मागे टाकले आहे. यामध्ये नरेंद्र हिरवानी यांचा ३६ विकेट घेऊन पहिल्या क्रमांकावर आहे.

५) या मालिकेत आतापर्यंत २५ फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी LBW आउट केले आहे. १९७९-८० नंतर ( २४ LBW वि. ऑस्ट्रेलिया) आणि २०१६-१७ ( २४ LBW वि. इंग्लंड) भारताची हि आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

६) अक्षर पटेलनं कसोटीत पदार्पण केल्यापासून सहा डावांमध्ये चार वेळा पाच पेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक २८ विकेट्स घेत त्याने अनेक खेळाडूंना मागे टाकले आहे. दीलीप जोशी यांनी ६ सामन्यांत २७ विकेट्स, शिवलाल यादव यांनी ६ सामन्यांत २४ विकेट्स, , आर अश्विन ३ सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या होत्या.