टी-20 मध्ये कोण ठरणार वरचढ : भारत आणि इंग्लंडमध्ये सीरीजचा निर्णायक सामना आज

नवी दिल्ली : दबावाच्या स्थितीत इंग्लंडच्या बरोबरीत आल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला भारत शनिवारी येथे होणार्‍या पाचव्या आणि अंतिम टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये विजय नोंदवून मालिका आपल्या नावावर करण्यासह वर्ल्ड कपसाठी आपल्या मुख्य टीमची रचना तयार करण्याच्या दिशेने आणखी एक मजबूत पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. टी-20 मधील दोन प्रमुख संघांमध्ये शनिवारी निर्णायक सामन्यात एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्याची स्पर्धा असेल. भारताने आतापर्यंत मालिकेमध्ये बिनधास्त भूमिका घेतली आहे आणि पाचव्या मॅचचा परिणाम जो सुद्धा असेल, पण ही वर्ल्ड कपसाठी तयारीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे.

वर्ल्ड कप यावर्षी भारतातच खेळवला जाणार आहे. किशन आणि सूर्यकुमारने आपल्या पहिल्या मालिकेत मोठा प्रभाव पाडला तर हरियाणाचा ऑलराऊंडर राहुल तेवतिया टीममध्ये सहभागी असा एकमेव खेळाडू आहे ज्यास पदार्पणाची संधी मिळाली नाही. शनिवारी त्यास आपली पहिली अंतरराष्ट्रीय मॅच खेळण्याची संधी मिळू शकते. कोहली या गोष्टीने संतुष्ट असेल की, भारताने चांगला स्कोअर बनवला आणि रात्री दवाचा परिणाम असूनही त्याच्यापासून बचाव करण्यात यशस्वी ठरला.

टीम अशी आहे

भारत :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल चाहर, राहुल तेवतिया, इशान किशन यांच्यापैकी.

इंग्लंड :
इयोन मोर्गन (कर्णधार), जोस बटलर, जॅसन रॉय, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोइन अली, आदिल राशिद, रिस टॉपले, क्रिस जॉर्डन, मार्क वुड, सॅम कुरेन, टॉम कुरेन, सॅम बिलिंग्ज, जॉनी बेयरस्टो, जोफरा आर्चर यांच्यापैकी.