IND vs ENG | भारताच्या दीप्ती शर्माने चेंडू न टाकताच घेतली विकेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IND vs ENG | टीम इंडियाने (India) शनिवारी इंग्लंड (Engand) विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात इंग्लडला हरवून तीन मॅचच्या वनडे सीरीजमध्ये (ODI Series) क्लीन स्वीप (Clean Sweep) केले आहे. प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानात (Lord’s Ground) हा सामना खेळवण्यात आला होता. भारतीय महिला टीमने (Indian Women’s Team) पहिल्यांदाच इंग्लंडच्या (IND vs ENG) भूमीवर इंग्लडला क्लीन स्वीप केले आहे. टीम इंडियाने 16 धावांनी शेवटचा वनडे सामना जिंकला. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयापेक्षा शेवटी जे घडले त्याचीच जास्त चर्चा रंगली.

 

 

काय घडले नेमके शेवटी ?
शनिवारी सीरीजमधला शेवटचा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 169 धावा केल्या. एवढे माफक आव्हान इंग्लंड सहज पार करेल असे वाटत होते. मात्र भारताच्या गोलंदाजांनी जोरदार गोलंदाजी करत इंग्लडला पळता भुई थोडी केली. इंग्लंडकडून चार्ली डीन हिने सर्वाधिक धावा केल्या. (IND vs ENG)

 

इंग्लंडला विजयासाठी फक्त 17 धावांची गरज होती. त्यावेळी दीप्ती शर्मा (Deepti Sharma) 44 व्या ओव्हरला गोलंदाजीला आली.
या ओव्हरचा चौथा चेंडू टाकताना हि घटना घडली. 44 व्या ओव्हरमध्ये दीप्ती चौथा चेंडू टाकण्यासाठी स्टम्पसजवळ पोहोचली.
त्यावेळी नॉन स्ट्राइक एन्डवरुन चार्ली डीनने क्रीज सोडला होता. ती क्रीजच्या पुढे निघून गेली होती.
दीप्तीने लगेच आपला रन-अप थांबवून बेल्स उडवल्या आणि डीनला रनआऊट केले.
अशा प्रकारे दीप्ती शर्माने बॉल न टाकता इंग्लंडची शेवटची विकेट घेतली.

 

Web Title :- IND vs ENG | ind vs eng 3rd odi deepti sharma run out charlie dean england cricketers spirit of cricket

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | खडकीत पूर्व वैमनस्यातून दोन गटात राडा; चाकूने परस्परावर वार, 11 जणांना अटक

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा