इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये तो ४ कसोटी, ५ टी -२० आणि ३ वनडे खेळणार आहे. त्यामधील ३ टेस्ट मॅच झाल्या आहेत. यामध्ये भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. यामध्येच आता भारताचा मुख्य जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह याला येत्या काही सामन्यासाठी बीसीसीआयच्या वर्कलोड मॅनेजमेंटनुसार विश्रांती देण्यात येणार आहे. वैयक्तीक कारणामुळे चौथ्या कसोटीसाठी त्याचा विचार केला जाऊ नये असे सांगितले आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी त्याचा विचार करण्यात येणार नाही.

तसेच बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी देखील विश्रांती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. २३ मार्चपासून पुण्यामध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यामधील वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. वनडे मालिकेच्या आधी होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बुमराहला याअगोदरच विश्रांती देण्यात आली आहे.

बुमराहच्या गैरहजेरीत भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. विशेषत: या वर्षाअखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा विचार करता अनेक जलद गोलंदाज आपल्याला संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. या टी-२० संघात टी.नटराजन, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर आणि नवदीप सैनी यांना संधी मिळू शकते. तसेच काहींना वनडे संघात देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेनंतर वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.