Ind vs Eng : पदार्पणाच्या मॅचमध्ये ईशान किशनने रचला इतिहास, रहाणेच्या क्लबमध्ये झाला समावेश

अहमदाबाद : ईशान किशनने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केले आहे. त्याने आपल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये अर्धशतक केले. इंग्लंडविरूद्ध टी-20 सीरीजच्या दुसर्‍या मॅचमध्ये ईशान किशनला खेळण्याची संधी मिळाली. तो 32 चेंडूवर 56 धावा करून आऊट झाला. त्याने 4 षटकार आणि 5 चौकार लावले. त्याने आदिल राशिदच्या चेंडूवर षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले.

आपल्या पहिल्या टी20 मॅचमध्ये ईशान किशनने इतिहास रचला. ईशान पदार्पणात टी20 मॅचमध्ये अर्धशतक करणारा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या अगोदर अजिंक्य रहाणेने ही कामगिरी केली आहे. रहाणेने इंग्लंडविरूद्ध 2011 मध्ये मॅनचेस्टर टी20 मध्ये 61 धावा केल्या होत्या.

ईशानने 32 चेंडूच्या डावात पाच चौकार आणि चार षटकार मारले, मात्र तो आपला डाव आणखी वाढवू शकला नाही आणि राशिदच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. अजूनपर्यंत टी20 इंटरनॅशनलमध्ये अवघ्या तीन खेळाडूंनी पदार्पणात शतक केले आहे. लेस्ली डनबर (सर्बिया), रविंदरपाल सिंह(कॅनडा) आणि जेपी कॉट्जे(नाम्बीया) यांनी ही कामगिरी केली आहे.

ईशान किशन स्थानिक क्रिकेटमध्ये झारखंड आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळतो. तो आयपीएलमध्ये गुजरात लायन्ससाठी सुद्धा खेळला आहे. या सीझनच्या विजय हजारे ट्रॉफीत सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली होती. ईशानने आयपीएलच्या 51 मॅचेसमध्ये 1211 धावा बनवल्या आहेत. या दरम्यान त्याचा सर्वाधिक स्कोअर 99 धावा आहे आणि त्याने 7 अर्धशतक केली आहेत.

तो 2016 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचा कर्णधार सुद्धा होता. मात्र, भारताला त्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वेस्टइंडीजकडून पराभूत व्हावे लागले होते.