Ind vs Eng : शार्दुल ठाकुरला ‘मॅन ऑफ द मॅच’ न मिळाल्याने कोहलीने व्यक्त केले आश्यर्च, केले ‘हे’ मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वनडे सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरला मॅन ऑफ द मॅच न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले. एवढेच नव्हे, कोहलीने भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सीरीज न मिळाल्याने सुद्धा आश्चर्य व्यक्त केले. शार्दुलने मॅचमध्ये 30 धावा बनवण्यासह चार विकेट सुद्धा घेतल्या, तर भुवनेश्वरने संपूर्ण सीरीजमध्ये चांगली गोलंदाजी केली.

इंग्लंडकडून नाबाद 95 धावांची खेळी करणारा सॅम कुरेनला मॅन ऑफ द मॅच आणि सीरीजमध्ये 219 धावा करणार्‍या जॉनी बेयरस्टॉला मॅन ऑफ द सीरीज निवडले गेले. मॅचनंतर कर्णधार कोहलीने म्हटले की, मला आश्चर्य वाटत आहे की, शार्दुलला मॅन ऑफ द मॅच आणि भुवीला मॅन ऑफ द सीरीज निवडण्यात आले नाही. सर्वात जास्त श्रेय गोलंदाजांना दिले जाते, ज्यांनी प्रतिकुल स्थितीत चांगली गोलंदाजी केली.

विराट कोहलीने म्हटले की, जेव्हा दोन सर्वश्रेष्ठ टीम एकमेकांना भिडतात तेव्हा रोमांचक मॅच पहायला मिळते. कुणालाही मॅच सोडायची नसते आणि सॅम कुरेनने चांगला डाव खेळला आणि आपल्या टीमला मॅचमध्ये कायम राखले. कोहलीने म्हटले, आमच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्या. या मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक कॅच सोडले ज्यामुळे कर्णधार कोहली खुप नाराज दिसला.

त्याने म्हटले की, खेळाडूंनी जे कॅच सोडले त्यामुळे मी खुप नाराज आहे. तुम्ही जेवढे कॅच सोडाल मॅचमध्ये तुम्ही तेवढेच खाली जात रहाल आणि अनेकदा हे कॅच महागात पडू शकतात. आमच्या इंटेंट आणि बॉडी लँग्वेजमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. अखेर आम्ही मॅच जिंकली.

इंग्लंड टीमच्या कर्णधाराने काय म्हटले
इंग्लंडचा प्रभारी कर्णधार जोस बटलरने म्हटले की, या काळातील अनुभव वर्ल्डकपमध्ये उपयोगी येईल. बटलरने म्हटले की, उत्कृष्ट मॅच. दोन्ही टीमने काही चुका केल्या परंतु चांगले क्रिकेटसुद्धा खेळले. आम्ही कुरेनचा उत्तम खेळ पाहिले ज्यामुळे आम्ही लक्ष्याजवळ पोहचलो होतो, परंतु भारताला या विजयासाठी शुभेच्छा.