‘कप्तानी’मध्ये विराट कोहली ‘सुपरहिट’, महेंद्रसिंग धोनीचा ‘विक्रम’ मोडला, जाणून घ्या रेकॉर्ड

पोलिसनामा ऑनलाईन : चेन्नईत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात भारताने इंग्लंडचा 317 धावांनी पराभव केला होता. या विजयासह विराट कोहलीने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय घरच्या मैदानावरील हा 21 वा विजय आहे. 28 व्या कसोटी सामन्यात कोहलीला हे यश मिळाले. त्याचवेळी, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने घरच्या मैदानावर 30 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 21 विजयी झाले आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोन सामने गमावले आहेत, तर 5 सामने अनिर्णित आहेत. त्याचवेळी धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने तीन सामने गमावले आणि 6 सामने अनिर्णित राहिले. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीकडे धोनीला मागे टाकण्याची संधी आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे दोन सामने बाकी आहेत. जर भारतीय संघाने दोनपैकी एक सामना जिंकला तर कोहली धोनीला मागे टाकेल.

विराट कोहलीने आतापर्यंत 58 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 34 विजयी, 14 पराभव आणि 10 अनिर्णित राहिले आहेत. विजयाची टक्केवारी पाहिल्यास विराट कोहली धोनीच्या पुढे आहे. धोनीने 60 कसोटी संघाचे नेतृत्व केले, 27 जिंकले आणि 18 गमावले. 15 सामने अनिर्णित होते.

इंग्लंडविरूद्ध सर्वात मोठा विजय
चेपॉकमध्ये 482 धावांचं लक्ष घेऊ मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ चौथ्या दिवशी 1 164 धावांवर बाद झाला. इंग्लंडविरुद्धचा हा भारताचा सर्वात मोठा विजय आहे. इंग्लंडवर 717 धावांचा विजय हा टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधील पाचवा सर्वात मोठा विजय आहे.

डिसेंबर 2015 मध्ये दिल्लीच्या कोटला येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतीय संघाने सर्वात मोठा विजय मिळविला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात त्याने आफ्रिकन संघाचा 337 धावांनी पराभव केला.