IND vs NED | ‘या’ भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करणे विराटपेक्षा अवघड आहे, नेदरलँड्सच्या गोलंदाजांची प्रतिक्रिया

मेलबर्न : वृत्तसंस्था – IND vs NED | टीम इंडियाचा (India) दुसरा सामना काल नेदरलँड्सविरुद्ध (Netherlands) पार पडला. सिडनीच्या मैदानात (Sydney Grounds) हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात (IND vs NED) टीम इंडियाने नेदरलँड्सवर 56 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी अर्धशतकी पारी खेळली. विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव हे दोन खेळाडू आशिया चषकापासून (Asia Cup) जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.

“विराट कोहलीला एकवेळ बॉलिंग करणं सोप्पं आहे. परंतु सुर्यकुमार यादवला”
हा सामना संपल्यानंतर नेदरलॅंडचा गोलंदाज पॉल वॉन मीकेरनने “विराट कोहलीला एकवेळ बॉलिंग करणं सोप्पं आहे. परंतु सुर्यकुमार यादवला बॉलिंग करताना अधिक दबावाखाली असल्याचे त्याने सांगितले. कालच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने वादळी खेळी करत 25 चेंडूत त्याने 7 चौके आणि 1 षटकार मारून 51 धावा काढल्या.

पॉल वॉन मीकेरन (Paul Von Meekeran) पुढे म्हणाला, कालच्या सामन्यात (IND vs NED)
विराट कोहलीने चांगले शॉट्स खेळले. “सुर्यकुमार यादवला गोलंदाजी करीत असताना, तुम्ही थोडीसी जरी चुकी केली,
तरी त्याची शिक्षा मिळते. त्यामुळे तुम्हाला गोलंदाजी करीत असताना अधिक काळजी घ्यावी लागते.
त्यामुळे विराट कोहलीपेक्षा सुर्यकुमार यादवला गोलंदाजी करणं अधिक अवघड असल्याचे तो म्हणाला.