IND vs NZ 2nd T20 | सूर्यकुमारच्या रडारवर आहे एबी डिव्हिलियर्सचा ‘तो’ विक्रम

पोलीसनामा ऑनलाईन टीम – IND vs NZ 2nd T20 | सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात T20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना हा न्यूझीलंडने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज त्यांच्यात दुसरा सामना पार पडणार आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला एबी डिव्हिलियर्सचा एक विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. (IND vs NZ 2nd T20)
Ranchi Ready 👍👍#TeamIndia | #INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/Oydd6Lb1oj
— BCCI (@BCCI) January 27, 2023
काय आहे तो विक्रम?
सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ 44 डावात 1625 धावा केल्या आहेत. यासह सूर्यकुमार टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत टॉप-5मध्ये सामील झाला आहे. मात्र जर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात 47 धावा केल्या, तर तो या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकू शकतो. सूर्याने या अगोदर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सुरेश रैना यांचा मागे टाकले आहे.
टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली – 4008 धावा
रोहित शर्मा – 3853 धावा
केएल राहुल – 2265धावा
शिखर धवन – 1759 धावा
एबी डिव्हिलियर्स – 1672 धावा
सूर्यकुमार यादव – 1625 धावा
भारतीय संघ: शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, पृथ्वी शॉ, युझवेंद्र चहल, जितेश शर्मा , मुकेश कुमार.
न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, हेन्री शिपले, मायकेल रिप्पन, डेन क्लीव्हर, बेन लिस्टर.
Web Title :- IND vs NZ 2nd T20 | ind vs nz 2nd t20 suryakumar yadav has a chance to break ab de villiers record
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण