IND vs NZ 3rd T20 | भारत आणि न्यूझीलंड सामना हॉटस्टारवर नाहीतर ‘या’ अ‍ॅपवर पाहता येणार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – IND vs NZ 3rd T20 | टीम इंडिया (India) सध्या न्यूझीलंडच्या (New Zealand) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते 3 टी-20 तसेच 3 वनडे सामन्याची मालिका खेळणार आहेत. या दौऱ्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 मालिकेचे तर शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडे मालिकेचे नेतृत्व करणार आहे. सध्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना (IND vs NZ 3rd T20) आज म्हणजे मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी मॅक्लीन पार्क नेपियर (Mclean Park) येथे होणार आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. यानंतर टीम इंडियाने दुसरा सामना 65 धावांनी जिंकला होता.

 

या सामन्याच्या अगोदर न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) मेडिकल कारणामुळे तिसऱ्या सामन्याला मुकणार आहे. त्याच्या जागी टीम साऊथी (Tim Southee) न्यूझीलंड संघाची धुरा सांभाळणार आहे. केन विलियम्सनच्या जागी मार्क चॅपमनचा (Mark Chapman) संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात. वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) तसेच कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांना संघात स्थान दिले जाऊ शकते.

 

सामना कुठे आणि कधी पाहू शकणार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे.
हा सामना तुम्हाला अमेझॉन प्राइमवर (Amazon Prime) लाइव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ अ‍ॅपवर पाहता येणार आहे.
तसेच दूरदर्शनच्या डी डी स्पोर्ट्सवर (DD Sports) देखील तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

 

Web Title :- IND vs NZ 3rd T20 | ind vs nz 3rd t20i match when and where to watch live telecast on which channel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nora Fatehi | नोरा फतेहीबरोबर सहकलाकाराने केलं गैरवर्तन अन् दोघांमध्येही सेटवरच झाले भांडण; अभिनेत्रीनं सांगितलेला ‘तो’ किस्सा चर्चेत

Sanjay Raut | शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणारे सीमाप्रश्नाला काय न्याय देणार?

Pune Crime | सावत्र बापाने केले 15 वर्षाच्या मुलीला गर्भवती; नराधम बापाला अटक, वानवडी पोलीस ठाण्यात FIR