IND vs NZ 3rd T20 | सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन वैद्यकीय कारणामुळे बाहेर
पोलीसनामा ऑनलाईन टीम – IND vs NZ 3rd T20 | सध्या भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात तीन सामन्यांची टी-20 (T-20 Series) मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील तिसरा सामना 22 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याअगोदर न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय कारणामुळे कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) तिसऱ्या टी-20 मधून बाहेर झाला आहे. (IND vs NZ 3rd T20)
BLACKCAPS captain Kane Williamson will miss the third T20I in Napier on Tuesday to attend a pre-arranged medical appointment. @aucklandcricket Aces batsman Mark Chapman will join the T20 squad in Napier today. #NZvIND https://t.co/kktn9lghhy
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 21, 2022
अगोदरच वैद्यकीय अपॉइंटमेंट घेतली असल्यामुळे विल्यमसन तिसऱ्या टी-20 सामन्याला मुकणार आहे. त्याच्या जागी वरिष्ठ वेगवान गोलंदाज टीम साऊथी (Tim Southee) न्यूझीलंडचे कर्णधारपद सांभाळणार आहे. केन विल्यमसन बाहेर पडल्यामुळे डावखुरा स्फोटक फलंदाज मार्क चॅपमन (Mark Chapman) संघात परतला आहे. तिसऱ्या सामन्यात केन विल्यमसनच्या जागी त्याला संधी मिळू शकते. केन विल्यमसन बाहेर पडल्यामुळे न्यूझीलंडसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
टी-20 मालिकेनंतर न्यूझीलंड संघ भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे.
या वनडे मालिकेच्या अगोदर केन विल्यमसन संघात माघारी परतु शकतो.
पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी ऑकलंडमध्ये (Auckland) होणार आहे.
या मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
त्याचबरोबर युवा खेळाडूंना सोबत घेऊन टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
Web Title :- IND vs NZ 3rd T20 | ind vs nz t20 series kane willamson out of third t20 match against india
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Supriya Sule | ‘पत्रकार मुली साड्या का नाही नेसत?’ विधानावर सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
Kangana Ranaut On Tabu – Drishyam 2 | ‘दृश्यम 2’मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य; पोस्ट व्हायरल