IND vs NZ : मैदानावर झळकलं We Miss You Dhoni चं ‘पोस्टर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियानं न्युझिलंडविरुद्धच्या टी 20 सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. आपल्या अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना टीम इंडियानं चौथ्या टी 20 सामन्यात विश्रांती दिली आहे. आणि तरुण खेळाडूंना संधी दिली आहे. भारतीय संघाची या सामन्यात काही विशेष सुरुवात दिसून नाही आली. यावेळी धोनीबद्दल एक वेगळाच प्रसंग पहायला मिळाला.

वेलिंग्टनच्या मैदानावर धोनीबद्दल काही पोस्टर्स पहायला मिळाले. सामना पाहण्यासाठी आलेल्या काही चाहत्यांनी मैदनावार We Miss You Dhoni असे पोस्टर दाखवले ज्यातून त्यांचं धोनीप्रित प्रेम दिसून आलं.

सोशल मीडियावर आजही अनेक चाहते धोनीला भारतीय संघात स्थान मिळेल अशा आशेवर आहेत. 2019 च्या वर्ल्ड कप नंतर भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान मिळालं नाही. धोनीच्या निवृत्तीबद्दलत मधल्या काळात अनेक चर्चा होताना दिसून आल्या. सर्वांनी असाही अंदाज व्यक्त केला होता की, आयपीएलनंतर धोनी निवृत्ती घेऊ शकतो. आगामी काळात धोनी निवृत्तीबद्दल नेमका काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.