IND vs NZ | T 20 सिरीजमधील दुसरी मॅच स्थगित करण्याची मागणी, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IND vs NZ | भारत विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सिरीजच्या (India vs New Zealand) दुसऱ्या सामन्याविरुद्ध झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामना स्थगित किंवा प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा आणावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात बुधवारी पहिली टी20 मॅच खेळवण्यात आली. कोरोनाच्या लाटेनंतर ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच होती. या मॅचमध्ये कोरोनाच्या नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले.

 

याच पार्श्वभूमीवर झारखंड उच्च न्यायालयात (Jharkhand High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. झारखंड राज्य क्रिकेट संघाच्या (Jharkhand State Cricket Association) जेएससीए स्टेडिअममध्ये (JSCA Stadium) न्यूझीलंड आणि भारत (IND vs NZ) यांच्याचा सिरीजमधील खेळवण्यात येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रवेशावर आक्षेप नोंदवत झारखंड उच्च न्यायालयाचे अधिवक्ता धीरज कुमार (Jharkhand High Court Advocate Dheeraj Kumar) यांनी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 

त्यांनी आपल्या याचिकेत जेव्हा राज्यातील मंदिर, सर्व कार्यालयांमध्ये कोव्हिड नियमाअंतर्गत 50 टक्के कामगारांना परवानगी देण्यात आली आहे.
मग कोणत्या आधारावर राज्य सरकारने स्टेडिअममध्ये 100 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे.
असा सवाल केला आहे. तसेच होणारी मॅच स्थगित करण्यात यावी,
किंवा स्टेडिअममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर मर्यादा आणाव्यात अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
यासोबतच याचिकाकर्त्याने लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी 20 सिरीजचा दुसरा सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे.

 

Web Title :- IND vs NZ | cloud of crisis over second t20 to be played between india and new zealand petition filed in jharkhand high court to postpone match

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ

Gold-Silver Price Today | सोन्याच्या दरात उसळी, चांदी झाली ‘स्वस्त’; जाणून घ्या 1 तोळ्याचा दर