IND vs NZ | शास्त्री-कोहली जोडीनं ‘खंडीत’ केलेली ‘परंपरा’ राहुल द्रविडनं पुन्हा सुरू केली; सुनिल गावस्करांनी केलं ‘कौतुक’

रांची : वृत्तसंस्था – भारतीय गोलंदाजांनी कालच्या सामन्यात उत्तम गोलंदाजी करत न्यूझीलंडला (IND vs NZ) 6 बाद 153 धावांवर रोखण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. न्यूझीलंडने डावाची सुरुवात जोरदार केली होती. त्यांनी पॉवर प्लेमध्ये 1 बाद 64 धावा केल्या होत्या, परंतु त्यापुढील 14 षटकांत त्यांना 5 बाद 89 धावा करता आल्या. या सामन्यातून (IND vs NZ) भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलनं (Hershal Patel) सर्वाधिक 2 विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. या सामन्यातून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या जोडीने खंडीत केलेली परंपरा पुन्हा सुरू केली. यामुळे महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी राहुल द्रविडचे कौतुक केले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला ६ खेळाडूंच्या बदल्यात फक्त 153 धावा करता आल्या. या सामन्यात (IND vs NZ) भारताचा फिरकीपटू आर अश्विन (R. Ashwin) यानं त्याच्या चार षटकांत 19 धावांत 1 विकेट घेतली. हर्षलनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), दीपक चहर (Deepak Chahar) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) यांना प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले. या सामन्यानंतर पदार्पणवीर हर्षल पटेल याने आपली प्रतिक्रिया दिली. यामध्ये ”देशाची जर्सी घालण्याची भावना काही वेगळीच असते. या खेळावर प्रेम करता म्हणून तुम्ही खेळायला सुरुवात करता आणि तेव्हा तुमच्यासमोर टीम इंडिया हेच ध्येय असते. मी स्वतःला वचन दिले होते की मी स्वतःला गृहीत धरणार नाही. राहुलभाईंनी मला सांगितले, की तुझा सराव झाल्यानंतर इथे ये आणि खेळाचा आस्वाद लुट. स्थानिक क्रिकेटमधील 9-10 वर्ष, आयपीएलनंतर मी इथवर पोहोचलो. याचे मला खूप समाधान आहे.” असे तो म्हणाला.

या सामन्याच्या अगोदर हर्षल पटेलला माजी गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar) याच्याकडून पदार्पणाची कॅप देण्यात आली. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी त्यांच्या प्रशिक्षकपादाच्या कार्यकाळात पदार्पणवीराला माजी खेळाडूंच्या हस्ते कॅप देण्याची प्रथा सुरू केली होती. पण, शास्त्री व कोहली यांच्या कार्यकाळात हि प्रथा बंद करण्यात आली होती. यानंतर राहुल द्रविडने हि प्रथा सुरु केली असल्याचे सुनील गावस्कर म्हणाले.

 

Web Title : IND vs NZ | ind vs nz 2nd t20i rahul dravid has started culture again giving india cap youngsters marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

N. Chandrababu Naidu | पत्नीच्या ‘अपमाना’मुळे रडले चंद्राबाबू नायडू; म्हणाले – ‘आता CM बनल्यानंतरच येईन विधानसभेत’ (व्हिडीओ)

Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला पावसाचा इशारा

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक