IND vs NZ : विराट कोहलीने शमीला ट्रोल करणार्‍यांना फटकारले, म्हणाला – ‘धर्मावरून निशाणा बनवणे तुच्छता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IND vs NZ | विराट कोहली (Virat Kohli) ने न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2021 (ICC T20 World Cup 2021) सामन्यापूर्वी (IND vs NZ) सोशल मीडिया ट्रोलर्सला जोरदार फटकारले. विराट कोहलीने म्हटले, अनेक लोक सोशल मीडियामध्ये आपली ओळख लपवतात. नंतर खेळाडूंना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात आणि हा त्यांच्या जीवनाचा अतिशय खालचा स्तर आहे. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे, ज्यामुळे ते हा ड्रामा करतात. आम्हाला माहिती आहे की, खेळाडूंचे समर्थन कसे केले जाते. सोशल मीडिया ट्रोलिंग आणि बाहेरील आवाजाला आमच्या दृष्टीने काहीही किंमत नाही.

 

विराट कोहलीने म्हटले, काही लोकांनी सोशल मीडियावर ट्रोलिंग केले. त्यांच्यात ना हिंमत आहे, ना कणा. आमच्या संघाला याची पर्वा नाही की बाहेर काय होत आहे. आम्ही केवळ खेळावर लक्ष केंद्रित करतो, जो खेळ आम्ही खेळतो.

विराट कोहलीने पुढे म्हटले, माझ्यासाठी, कुणाच्याही धर्मावर हल्ला करणे सर्वात निंदनीय बाब आहे. जे एक मनुष्य करू शकत नाही. धर्म प्रत्येकासाठी खुप पवित्र आहे. त्याने पुढे म्हटले, आम्ही 200 टक्के शमीसोबत आहोत. आमच्या बंधुभावाला, आमच्या मैत्रीला टीममध्ये धक्का लागू शकत नाही. लोक पुन्हा येऊ शकतात, परंतु आमच्या टीमध्ये (IND vs NZ) काहीही होणार नाही. एक कर्णधार म्हणून मी हे बोलू शकतो. देशासाठी मोहम्मद शमीचा (mohammed shami) जोश, आणि ज्याप्रकारे तो दिवसेंदिवस धावतोय, ते अविश्वसनीय आहे.

 

कोहलीने म्हटले, आम्ही जे करतो ते खेळासाठी करतो आणि यापैकी कुणीही (सोशल मीडिया ट्रोल्स) असे काही करण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. यांच्यात ना काही करण्याचे धाडस आहे आणि ना कणा, मी याकडे असे पाहतो. एक टीम म्हणून आम्ही समजतो की, आम्ही कशाप्रकारे एकमेकांच्या सोबत राहिले पाहिजे आणि आम्ही कोणत्या लोकांचे समर्थन केले पाहिजे आणि कशाप्रकारे आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.

 

जर तुम्ही बाहेरचे लोक असा विचार करत असाल की, भारताचा कोणत्याही मॅचमध्ये पराभव होऊ शकत नाही तर ते आमचे काम नाही,
कारण आम्ही खेळ खेळत आहोत. आम्हाला माहित आहे खेळ कसा असतो.
यासाठी लोक बाहेरून कसा विचार करतात,
यास आमच्या दृष्टीने काहीही किंमत नाही.
आम्ही कधीही त्याकडे लक्ष दिले नाही आणि आम्ही यापुढेही लक्ष देणार नाही.

 

हे आहे प्रकरण

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2021 च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून (India vs Pakistan) पराभव पत्करावा लागला होता.
या पराभवानंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमी आणि टीम इंडियाला खुप ट्रोल करण्यात आले होते.
शमी आणि टीम इंडियाच्या ट्रोलिंगनंतर माजी आणि दिग्गज क्रिकेटर टीम इंडियाच्या समर्थनासाठी उतरले होते.

 

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2021 मध्ये भारताचा पुढील सामना 31 ऑक्टोबर म्हणजे रविवारी न्यूझीलंडसोबत आहे.
हा न्यूझीलंडचा सुद्धा दुसरा सामना आहे.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) दोन्ही संघांना टी20 वर्ल्ड कप 2021 च्या आपआपल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

 

Web Title :- IND vs NZ | ind vs nz icc t20 world cup 2021 virat kohli finally breaks silence on mohammad shami trolling after pakistan clash

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Breast Cancer | पुरुषांमध्येही ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची समस्या निर्माण होऊ शकते; काय आहेत लक्षणे?, जाणून घ्या

MP Udayanraje Bhosale | ‘हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा’ (व्हिडीओ)

Actress Shweta Tiwari | 40 व्या वर्षी आपल्याच मुलीवर हॉटनेसच्या बाबतीत श्वेताने केली मात, गोल्डन शॉर्ट ड्रेसमध्ये शेयर केले छायाचित्र