IND Vs NZ | 2 देश, 2 अर्धशतकं आणि एकसारखा स्कोअर ! न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूने केला अनोखा रेकॉर्ड

जयपूर : वृत्तसंस्था – नुकत्याच पार पडलेल्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत फायनलपर्यंत धडक मारलेल्या न्यूझीलंडचा (New Zealand) पहिल्याच मॅचमध्ये पराभव झाला आहे. जयपूरमध्ये (Jaipur) बुधवारी झालेल्या टी20 मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा (IND Vs NZ) 5 विकेट्सनं पराभव करून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात (IND Vs NZ) टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने या सामन्यात तिसऱ्या बॉललाच धोकादायक डॅरेल मिचेलला बोल्ड केलं. यानंतर मार्टीन गप्टील (Martin Guptil) आणि मार्क चॅपमन (Mark Chapman) यांनी न्यूझीलंडची इनिंग सावरली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 109 रनची पार्टनरशिप केली.

 

 

या सामन्यात मार्क चॅपमन याच्या नावावर अनोख्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. या सामन्यात मार्क चॅपमन 63 रनवर आऊट झाला. मार्क चॅपमन हा दोन वेगवेगळ्या देशांकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू बनला आहे. विशेष म्हणजे त्यानं दोन्ही वेळेस एकसमान 63 रन काढले आहेत. मार्क चॅपमन याने पहिलं अर्धशतक हाँगकाँगकडून (Hong Kong) ओमान विरुद्ध झळकावलं होतं. त्याने हाँगकाँगकडून 2014 साली टी20 क्रिकेटमध्ये तर 2015 साली वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला आणि आता तो न्यूझीलंडच्या राष्ट्रीय टीमचा सदस्य आहे. (IND Vs NZ)

 

कालच्या सामन्यात (IND Vs NZ) मार्क चॅपमन ज्या प्रकारे बॅटिंग करत होता
ते पाहता न्यूझीलंड 180 चा टप्पा ओलांडेल असं वाटलं होत पण तसे झाले नाही.
भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि आर.अश्विन (R Ashwin)
यांनी टिच्चून बॉलिंग करत आणि मोक्याच्या क्षणी विकेट घेत न्यूझीलंडला मोठा स्कोअर करण्यापासून रोखलं.
या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन 2 विकेट तर अश्विनने 4 ओव्हरमध्ये फक्त 23 रन देऊन 2 विकेट मिळवल्या.
न्यूझीलंडने दिलेलं 165 रनचं आव्हान भारताने 5 विकेट्स आणि 2 बॉल राखून पार केले.
या विजयामुळे भारताने मालिकेत टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे.

 

Web Title :- IND Vs NZ | ind vs nz series 2021 mark chapman becomes first player to score fifties for two countries in t20i cricket

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा