IND Vs NZ | टेस्ट सिरीजमध्ये तब्बल 133 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती; ‘या’ अनोख्या रेकॉर्डशी केली बरोबरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IND Vs NZ | भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यातील दुसऱ्या टेस्टला मुंबईमध्ये (Mumbai Test) आजपासून सुरुवात झाली आहे. या टेस्टमध्ये दोन्ही संघात अनेक बदल करण्यात आले. या बदलांमुळे दोन्ही संघाने 133 वर्षापूर्वीच्या जुन्या रेकॉर्डशी बरोबर केली आहे. मुंबई कसोटीत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे कर्णधार बदलले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचे (Virat Kohli) पुनरागमन झाले आहे तर न्यूझीलंडच्या संघाला केन विल्यमसनशिवाय (Kane Williamson) मैदानात उतरावे लागले. केन विल्यमसनच्या जागी टॉम लॅथम (Tom Latham) कर्णधाराची धुरा सांभाळत आहे. यापूर्वी कानपूर कसोटीत अजिंक्य रहाणे भारताचा आणि विल्यमसन न्यूझीलंडचा कर्णधार होता. अशा प्रकारे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत (IND Vs NZ) चार खेळाडू कर्णधाराच्या भूमिकेत आले.

 

अशीच काहीशी परिस्थिती 1888-89 मध्ये इंग्लंड (England) – दक्षिण आफ्रिका (South Africa) झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत घडली होती. 1888-89 च्या इंग्लंड-दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चार वेगवेगळे कर्णधार बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1888-89 मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑब्रे स्मिथ (Aubrey Smith) इंग्लंडचे प्रमुख होते आणि ओवेन ड्युने (Owen Dunne) दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख होते. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत मॉन्टी बॉडेन (Monty Bowden) इंग्लंडचा कर्णधार आणि विल्यम मिल्टन (William Milton) दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार झाला.

 

 

 

यानंतर टेस्ट सिरीजमध्ये तब्बल 133 वर्षानंतर त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
या कसोटीच्या (IND Vs NZ) अगोदर भारताचे तीन आणि न्यूझीलंडचा एक खेळाडू बाहेर पडला आहे.
यामध्ये भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane),
वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)
दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहेत. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आपल्या कोपराच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

 

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा