IND Vs NZ | न्यूझीलंडविरुद्धच्या T20 सिरीजपूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितला टीम इंडियाचा ‘मास्टर प्लॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यातील तीन टी20 आणि 2 टेस्ट मॅचच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या सिरीजपासून (IND Vs NZ) टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. यादरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) T20 सिरीजपूर्वी टीम इंडियाचा मास्टर प्लॅन (Master Plan) सांगितला आहे. यावेळी राहुल द्रविडने टीम इंडियाच्या अनेक गोष्टींवर भाष्य केले.

आता सध्या जिंकायचं आहे आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या मोठ्या सामन्याची देखील तयारी करायची आहे. भविष्याचा विचार करणे हे माझे काम आहे. ते प्रत्येक संघासाठी सारखेच असेल. वेगवेगळ्या प्रकारासाठी वेगवेगळा संघ (IND Vs NZ) याबाबत कुठलाही विचार केला जात नाही. परंतु, सर्व प्रकार खेळणाऱ्या खेळाडूंना योग्य विश्रांती दिली जाईल असे राहुल द्रविड म्हणाला आहे.

संघात संतुलन असणे आवश्यक आहे. सध्या आमचे एकच लक्ष्य आहे.
आम्हाला प्रत्येक सामन्यात विजय मिळवायचा आहे.
आम्ही खेळाडूंच्या भविष्याचा आणि दीर्घकालीन कारकिर्दीचा विचार करू, परंतु अल्पकालीन ध्येयांसाठी,
त्यांच्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. अशी स्पष्ट भूमिका राहुल द्रविड यांनी मांडली आहे.

 

Web Title :- IND Vs NZ | rahul dravid team india coach plan for future team india rohit sharma india vs new zealand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kangana Ranaut | कंगना राणावत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ! महात्मा गांधी यांच्याबाबत म्हणाली…

Eknath Shinde | भाजपच्या ‘पार्ट टाइम मुख्यमंत्री’च्या टीकेला शिवसेनेचे सडेतोड उत्तर; एकनाथ शिंदे म्हणाले…

Shalu Chourasiya | बागेत फिरणार्‍या अभिनेत्रीवर ‘हल्ला’, चेहर्‍यावर ठोसे मारून केले असे ‘हाल’