IND vs NZ T20 Series | भारताविरुद्धच्या T – 20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; केन विलियम्सन नाही तर ‘हा’ खेळाडू असणार न्यूझीलंडचा कर्णधार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IND vs NZ T20 Series | नुकताच यूएईमध्ये T – 20 वर्ल्ड कप पार पडला. या स्पर्धेत न्यूझीलंडच्या (New Zealand) संघानं उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले आहे. यानंतर आता न्यूझीलंड आणि टीम इंडिया (India) यांच्यातल्या T- 20 मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियानं काही सीनियर खेळाडूंना विश्रांती देऊन आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) हा टीम इंडियाचा नवा कर्णधार असणार आहे, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक म्ह्णून काम पाहणार आहेत. यासाठी 14 नोव्हेंबरला फायनल झाल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू सोमवारी भारत दौऱ्यावर दाखल झाले आहेत. (IND vs NZ T20 Series)

न्यूझीलंडचा संघ या दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20 व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 17 नोव्हेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तर 25 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Ken Williamson)हा भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नसल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand Cricket Board) स्पष्ट केले आहे. केनच्या अनुपस्थितीत टीम साऊदी (Tim Southee) न्यूझीलंडचे कर्णधारपद सांभाळणार आहे. तसेच दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेणाऱ्या लॉकी फर्ग्युसनचे (Lockie Ferguson) कमबॅक झाले आहे. (IND vs NZ T20 Series)

 

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव,
रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान,
भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडचा संघ

मार्टीन गुप्टिल, डॅरील मिचेल, ग्लेन फिलिप्स, टीम सेईफर्ट, मार्क चॅपमॅन, जिमी निशॅम, मिचेल सँटनर,
कायले जेमिन्सन, इश सोढी, टॉड अ‍ॅस्टल, अ‍ॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी ( कर्णधार)

 

Web Title :- IND vs NZ T20 Series | india vs new zealand kane williamson will miss t20i series against india order prepare test series

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Hardik Pandya | ‘माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जातीय’ हार्दिक पांड्याचा ट्विटरद्वारे खुलासा; म्हणाला…

Ration Card | घरबसल्या केवळ एका क्लिकवर तयार होईल रेशनकार्ड, अतिशय सोपी आहे पद्धत; जाणून घ्या

Multibagger Stock | 22 रुपयांच्या ‘या’ शेयरमध्ये केवळ 25 हजार लावून लोक बनले करोडपती, मिळाला 4.5 कोटींचा रिटर्न, तुमच्याकडे आहे का?