IND Vs NZ Test Series | टीम इंडियाला मोठा धक्का ! रोहित-विराटनंतर ‘हा’ दिग्गज टेस्टमधून बाहेर

कानपुर : वृत्तसंस्था – नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध टी-20 सीरिज (T-20 Series) पार पडली. यामध्ये भारतीय टीमने न्यूझीलंडच्या संघाला नमवत सीरिजमध्ये 3-0 ने विजय मिळवला. यानंतर आता टीम इंडिया पहिल्या टेस्टसाठी कानपूरला (Kanpur Test) रवाना झाली आहे. 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमधील पहिली टेस्ट (IND Vs NZ Test Series) 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, पण या टेस्ट (IND Vs NZ Test Series) मॅचआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे पहिली टेस्ट खेळू शकणार नाही, असं बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी सांगितले आहे. मात्र केएल राहुलला नेमकी काय दुखापत झाली आहे, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

केएल राहुलने इंग्लंड (England) दौऱ्यापासून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते. या दौऱ्यात राहुल चांगलाच फॉर्ममध्ये होता, त्याने या दौऱ्यातल्या टेस्टमध्ये शतकही झळकावले होते. त्याने हाच फॉर्म टी-20 क्रिकेटमध्येही कायम ठेवला. न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 मधून राहुलला विश्रांती देण्यात आली होती, त्याआधी झालेल्या 5 टी-20 पैकी 4 सामन्यांमध्ये राहुलने अर्धशतकं केली होती.

न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली आहे,
तर विराट कोहली (Virat Kohli) पहिली टेस्ट खेळणार नाही.
त्यामुळे दोन्ही महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये आता केएल राहुलसारख्या महत्त्वाच्या खेळाडूचं नसणं टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
केएल राहुल पहिली टेस्ट खेळणार नसल्यामुळे आता मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) ओपनिंगला खेळतील हे जवळपास निश्चित झाले आहे.
तसेच दुसरीकडे मधल्या फळीत विराटच्या जागी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोन पर्याय टीम इंडियाकडे आहेत.
जेव्हा भारताची टेस्ट टीम जाहीर केली तेव्हा सूर्यकुमारची टेस्ट टीममध्ये निवड झाली नव्हती.
यानंतर त्याला टेस्ट टीमसोबत कानपूरला जायला सांगण्यात आले आहे. (IND Vs NZ Test Series)

 

Web Title :- IND Vs NZ Test Series | Big blow to Team India! After Rohit-Virat, ‘Ha’ veteran out of Test-K L Rahul

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘पहाटेच्या शपथविधीला 2 वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील’ – संजय राऊत

Pune Crime | पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये धक्कादायक प्रकार ! सुरक्षा रक्षकानं बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या 36 वर्षीय महिलेचं केलं व्हिडीओ शुटिंग

Multibagger Stock | 257 रुपयांचा शेयर झाला रू. 972 चा, 1 वर्षात 5 लाखाचे झाले 19 लाख, तुमच्याकडे आहे का?