IND vs NZ Test Series | मुंबईतल्या दुसऱ्या टेस्टसंदर्भात ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IND vs NZ Test Series | भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजमधला (IND vs NZ Test Series) दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणार आहे. या सामन्याला 3 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) स्टेडियममध्ये फक्त 25 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी देण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियमची क्षमता 30,000 हजार प्रेक्षकांची आहे. या सामन्यामधील प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (Mumbai Cricket Association) सांगण्यात आले आहे.

 

वानखेडे स्टेडियमवर अखेरची टेस्ट मॅच डिसेंबर 2016 साली खेळवण्यात आली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या मॅचमुळे (IND vs NZ Test Series) स्टेडियममध्ये टेस्ट क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे. विराट कोहलीसुद्धा (Virat Kohli) या सामन्यातून टीममध्ये पुनरागमन करणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर (T-20 World Cup) विराटला टी-20 सीरिज आणि टेस्ट सीरिजमधून आराम देण्यात आला होता.

 

 

दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे अनेक देश सतर्क झाले आहेत.
याची खबरदारी म्हणून देशातल्या इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही निर्बंध लावले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या नव्या व्हेरियंटमुळे टीम इंडियाचा पुढच्या महिन्यात सुरू होणारा दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa)
दौऱ्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. या दौऱ्याला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
यामध्ये भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 3 टेस्ट, 3 वनडे आणि 4 टी-20 मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे.
कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटमुळे आयसीसीने (ICC) झिम्बाब्वेमधला (Zimbabwe)
महिला क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायर 2021 (ICC Women’s World Cup Qualifier) स्थगित केला आहे.
याचबरोबर नेदरलँड्सनेही (Netherlands) अर्ध्यातूनच दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला आहे.

 

Web Title :- IND vs NZ Test Series | ind vs nz 2nd test only 25 percent spectators allowed in wankhede stadium mumbai thackeray government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा