IND Vs NZ Test Series | कानपूरमधील खेळपट्टी खराब, जाणून घ्या कोणी केली तक्रार

कानपूर : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ Test Series) यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला 25 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या सिरीजमधील (IND Vs NZ Test Series) पहिली टेस्ट कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियममध्ये (Green Park Stadium) खेळवण्यात येणार आहे. पण आता या मॅचला 2 दिवस बाकी असताना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमनी प्रॅक्टिस पिचबाबत तक्रार केली आहे. दोन्ही टीमना खेळाडूंना दुखापत होईल, याची भीती होती, यानंतर ‘पिच’मध्ये बदल करण्यात आला. कानपूरमध्ये 5 वर्षांनंतर टेस्ट होणार आहे.

 

टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) सोमवारी संध्याकाळी पिच पाहण्यासाठी गेले होते, पण पिच पाहून दोघंही नाराज झाले. यानंतर या दोघांनी न्युट्रल पिच क्युरेटर एल प्रशांत राव (Neutral pitch curator L. Prashant Rao) यांच्यासोबत चर्चा केली आणि पिचमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली. यानंतर न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टेड (New Zealand coach Gary Stead) यांनीसुद्धा पिचच्या बाऊन्सबाबत तक्रार केली. यानंतर मैदानाचे क्युरेटर शिवकुमार आणि बीसीसीआयचे न्युट्रल क्युरेटर एल प्रशांत राव यांनी नंतर पिचमध्ये सुधारणा केल्यानंतर न्यूझीलंडच्या टीमने आज सकाळी सराव केला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच 3 टी-20 मॅचची सीरिज झाली होती.
या सिरीजमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारताने न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला होता.
या टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे.
विराट कोहलीही (Virat Kohli) पहिली टेस्ट खेळणार नाही,
तर केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.
न्यूझीलंडचं भारतामधील रेकॉर्ड खराब आहे. दोन्ही टीममध्ये भारतात आतापर्यंत 11 टेस्ट सीरिज झाल्या,
यातल्या 9 सीरिज भारताने जिंकल्या तर 2 सीरिज बरोबरीत सुटल्या आहेत.
केन विलियमसनने (Ken Williamson) टेस्ट सीरिजच्या तयारीसाठी टी-20 सीरिजमधून माघार घेतली होती.

 

Web Title :- IND Vs NZ Test Series | ind vs nz test series both teams complain about practice pitch of kanpur Green Park Stadium kanpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP Vinay Sahsrabuddhe | भाजप खासदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले – ‘वडिलांना वचन दिलं म्हणून दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं’

Pune Crime | पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये धक्कादायक प्रकार ! सुरक्षा रक्षकानं बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या 36 वर्षीय महिलेचं केलं व्हिडीओ शुटिंग

ST Workers Strike | ‘एसटी आंदोलनात पडळकर, सदाभाऊ खोत तेल ओतण्याचे काम करतात’, शिवसेनेचा घणाघात