IND Vs NZ Test Series | कानपूर टेस्ट मॅचपूर्वी चेतेश्वर पुजाराकडून किवींना ‘इशारा’

कानपुर : वृत्तसंस्था –  भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ Test Series) यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचला 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरुवात होणार आहे. या मॅचपूर्वी (IND Vs NZ Test Series) टीम इंडियाचा उपकर्णधार चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) पत्रकार परिषद घेत न्यूझीलंडच्या संघाला धोक्याची घंटा दिली आहे. यावेळी पुजाराने आपण लवकरच शतक झळकावणार असल्याचे सांगितले तसेच त्याने अजिंक्य रहाणे देखील (Ajinkya Rahane) शतक झळकावण्याची शक्यता असल्याचे त्याने सांगितले.

 

तसेच पुजारा पुढे म्हणाला कि, काळजी करण्यासारखे काही नाही. मी 50-60 धावा करत आहे.
आणि जोपर्यंत मी असा खेळत आहे, तोपर्यंत काळजी करण्यासारखे काही नाही.
शतकही लवकरच झळकवणार आहे. अजिंक्य रहाणेबाबतही त्याने हेच सांगितले. पुजारा म्हणाला, रहाणे हा मोठा खेळाडू आहे.
काही वेळा खेळाडूला वाईट टप्प्यातून जावे लागते. तो त्याच्या जुन्या फॉर्मपासून फक्त एक डाव दूर आहे.
तो चांगल्या स्थितीत आहे आणि मला वाटते की तो या मालिकेत धावा करेल.

 

कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल

 

चेतेश्वर पुजारा कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्कच्या खेळपट्टीबद्दल म्हणाला कि, “मी आज खेळपट्टी पाहिली.
पण माझ्या अनुभवाप्रमाणे फिरकीपटूंना मदत करणे अपेक्षित आहे.
आम्ही न्यूझीलंडला हलक्यात घेणार नाही आणि त्यांच्यासाठी सर्व तयारी करू.
तसेच, सध्या आमचे लक्ष टीम इंडियाच्या विजयावर आहे.
आणि त्याच इराद्याने आम्ही मैदानात उतरू असे म्हणाला.

 

तसेच तो पुढे म्हणाला, आम्ही इंग्लंडमध्ये (England) चांगला खेळ दाखवला होता. मालिकेत दमदार पुनरागमन केले.
आता हाच क्रम न्यूझीलंडविरुद्धच्या (IND Vs NZ Test Series) मालिकेतही कायम ठेवावा लागणार आहे.
यावेळी चेतेश्वर पुजारा राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) कोचिंग संदर्भात बोलताना म्हणाला कि, त्याला ज्या प्रकारचा अनुभव आहे, तो आम्हाला मालिकेत मदत करेल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची क्रिकेटच्या दीर्घ फॉरमॅटमधील ही पहिली मोठी परीक्षा असणार आहे.

 

Web Title : IND Vs NZ Test Series | india vs new zealand 2021 1st test ajinkya rahane just one innings away from regaining back top form says cheteshwar pujara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये धक्कादायक प्रकार ! सुरक्षा रक्षकानं बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या 36 वर्षीय महिलेचं केलं व्हिडीओ शुटिंग

ST Workers Strike | ‘एसटी आंदोलनात पडळकर, सदाभाऊ खोत तेल ओतण्याचे काम करतात’, शिवसेनेचा घणाघात

Multibagger Stock | 257 रुपयांचा शेयर झाला रू. 972 चा, 1 वर्षात 5 लाखाचे झाले 19 लाख, तुमच्याकडे आहे का?