IND Vs NZ Test Series | न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूनं दिला इशारा; म्हणाला – ‘अश्विन-अक्षरसाठी प्लॅन रेडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या टीम इंडिया विरुद्धची टी20 मालिका पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने (India vs New Zealand) आता कसोटी (IND Vs NZ Test Series) मालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. हे दोन्ही संघ यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) आमने-सामने आले होते. या फायनल सामन्यात न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे (World Test Championship) जेतेपद पटकावले होते. या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. या मालिकेत (IND Vs NZ Test Series) न्यूझीलंडसमोर भारतीय स्पिनर्सचं मोठे आव्हान असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिली टेस्ट 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये (Kanpur) खेळवली जाणार आहे.

 

या टेस्टमध्ये (IND Vs NZ Test Series) भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी तयार असल्याचा विश्वास न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलर (Ross Taylor) याने व्यक्त केला आहे. ‘हे निश्चितच एक आव्हान असेल. मी त्यासाठी तयार आहे. भारताविरुद्ध किंवा ऑस्ट्रेलियात खेळण्यासारखे विदेशी टीमला कोणते अवघड आव्हान नाही. ही कदाचित टेस्ट क्रिकेटमधील दोन मोठी आव्हानं आहेत. पण,आम्ही तयार आहोत. आम्ही अंडरडॉग असून चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत.’ असे रॉस टेलर म्हणाला आहे.तसेच रॉस टेलर पुढे म्हणाला, ‘तुम्ही जगातील नंबर 1 टीम असला तरी भारताविरुद्ध भारतामध्ये खेळताना नेहमीच अंडरडॉग असता. अश्विन (R.Ashwin) आणि अक्षर पटेल (Axer Patel) या जोडीचा सामना करणे ही न्यूझीलंडसाठी या मालिकेत सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल. मी त्यांच्याविरुद्ध तयार केलेल्या रणनितीबाबत सांगणार नाही.

टीम इंडियानं कोणत्या खेळाडूंना उतरवण्याचं ठरवलं आहे, याबाबत मला माहिती नाही.
अक्षर पटेलनं इंग्लंड विरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
तसेच टीम इंडिया या सामन्यात दोन किंवा तीन स्पिनर्ससह खेळतील. अश्विन त्यापैकी एक असेल.
तो एक चांगला बॉलर आहे. विशेषत: या परिस्थितीमध्ये त्याला आम्ही कसं खेळू यावर
या मालिकेचं भवितव्य अवलंबून असणार आहे असे रॉस टेलरने सांगितले.
यावेळी न्यूझीलंडच्या बॅटर्सना टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सपासूनही सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
‘नवा बॉल आणि रिव्हर्स स्विंगमध्ये नेहमीच फास्ट बॉलिंग महत्त्वाची असते. पण, इथं स्पिनर्स नेहमी मोठी भूमिका बजावतात.
पण त्यामुळे आपण फक्त स्पिनर्सलाच महत्त्व दिलं. तर त्याचा फटका आपल्याला बसू शकतो असा इशारा त्याने न्यूझीलंडच्या संघाला दिला आहे.

 

Web Title :- IND Vs NZ Test Series | india vs new zealand test series ross taylor tight lipped on plans to tackle r ashwin and axar patel threat marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pankaja Munde | पंकजा मुंडेंनी पुन्हा व्यक्त केली खदखद, म्हणाल्या – ‘फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण…’

Crime News| धक्कादायक ! दोघांमध्ये ‘फाटल्या’नंतर रागाच्या भरात गर्लफ्रेन्डनं केला बॉयफ्रेन्डवर अ‍ॅसिड हल्ला, डोळा कामातूनच गेला

SL Vs WI Galle Test Match | वेस्ट इंडिजच्या खेळाडू Jeremy Solozano ला गंभीर दुखापत