IND vs NZ : सामना सुरु असतानाच मैदानावर राडा

न्यूझीलंड : वृत्तसंस्था – न्यूझीलंड आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तुफान राडा झाला. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवर सिफर्ट लवकर बाद झाल्यानंतर मुनरो आणि विल्समसन यांनी डाव सावरला. अखेर कृणाल पांड्याने मुनरोला झेलबाद करत ही जोडी फोडली. पांड्याने त्याच षटकात आणखी एक बळी टिपला, मात्र या विकेटमुळे मैदानावर एकच गोंधळ उडाला.

डॅरेल मिचेल फलंदाजी करत असताना कृणाल पांड्याने त्याला पायचीत केले. पंचांनी त्याला बाद दिले. पण चेंडू बॅटला लागला असल्याचे संघात मिचेलने DRS ची मदत घेतली. पण तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद ठरवल्याने मैदानात प्रचंड गोंधळ झाला. मिचेलला पंचांनी बाद दिल्यावर त्याने DRS ची मदत घेतली. DRS च्या हॉटस्पॉटमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट दिसून आले. पण तरीही तिसऱ्या पंचांनी मिचेलला बाद ठरवले.

घडलेल्या या साऱ्या प्रकारामुळे मैदानावर गोंधळ उडाला. कर्णधार केन विल्यमसन आणि मिचेल दोघांनी याबाबत मैदानावर तीव्र नापसंती व्यक्त केली. मात्र तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला असल्याने मिचेलला मैदानावर फलंदाजीसाठी परत बोलावता आले नाही. त्यातच DRS चा निर्णय चुकीचा ठरल्याने न्यूझीलंडकडे असलेला एकमेव रिव्ह्यूदेखील वाया गेला

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like