Video : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी भारतीय आर्मीनं बनवलं ‘ढोल रॅम्प’, व्हायरल झाला व्हिडीओ

नवी दिल्ली : सतत पाऊस असल्याने दिवसभराच्या खेळावर पाणी पडल्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ind vs nz wtc final) (डब्ल्यूटीसी) चा फायनल दूसर्‍या दिवसाचा खेळ झाला. न्यूझीलँडचा (ind vs nz wtc final) कर्णधार केन विलियम्सनने टॉस जिंकून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताला पहिली फलंदाजी दिली. रोहित शर्मा (34) आणि शुभमन गिल (28) मध्ये 62 धावांच्या शानदार सुरवातीसह भारतीची सुरूवात चांगली झाली.

दोघांनी नवीन ड्यूक चेंडू खेळला आणि भारताला डब्ल्यूटीसी फायनलमध्ये एक चांगली सुरूवात दिली परंतु खराब प्रकाशामुळे दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने तीन विकेट गमावून 146 धावा बनवल्या.

एकीकडे जिथे भारतीय खेळाडूंनी मैदानावर आपला जोष दाखवला तर दुसरीकडे टीम इंडियाचे चाहते मैदानाच्या बाहेर अनोख्या पद्धतीने समर्थन दर्शवत होते. भारतीय क्रिकेट टीमची सर्वात मोठी समर्थक समजली जाणारी भारत आर्मी (Bharat Army) सध्या साऊथेम्प्टनमध्ये आपल्या पसंतीच्या टीमला सपोर्ट करत आहे.

त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा वायरल आहे. ज्यामध्ये भारत आर्मीचे लोक खास प्रकारे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी गाणे गात आहेत. भारत आर्मीने ’वुई विल रॉक यू’ गाणे गाऊन टीम इंडिया आणि कॅप्टन कोहलीला समर्थन दर्शवले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारत आर्मीचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे जो खुप पसंत केला जात आहे.
साऊथेम्प्टनच्या द रोज बाऊलमध्ये भारत आर्मीने कोहलीसाठी वेगळ्या प्रकारे चीयर केले.
जेव्हा-जेव्हा टीम इंडिया एखादी मोठी आयसीसी टूर्नामेंट खेळते तेव्हा भारत आर्मी आपली उपस्थिती नोंदवते.

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये सुद्धा त्यांचे समर्थन भारताला उपयोगी पडणार आहे.
दुसरीकडे, भारत फायनलमध्ये न्यूझीलँडला आव्हान देण्यासाठी 300 च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्तचा स्कोअर उभारण्याचा प्रयत्न करेल.
तिसरा दिवस कोहलीसाठी शतक बनवण्याच्या दृष्टीने महत्वाचा असेल.
सध्या तो दुसर्‍या दिवशी 44 धावा बनवून नाबाद राहिला.

हे देखील वाचा

एक दिवसांच्या दिलाशानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ !

 

प्रदीप शर्मा यांच्या अडचणी वाढणार ! आता NIA करणार ‘हे’ काम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : ind vs nz wtc final bharat army showcased their love for indian captain virat kohli in world test championship final watch video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update