IND vs PAK | मोठा अनर्थ टळला ! भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानही क्षेपणास्त्र डागणार होता, पण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IND vs PAK | मागील आठवड्यात भारतीय क्षेपणास्त्र (Indian Missile) तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत कोसळले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामुळे पाकिस्तानने (Pakistan) संताप व्यक्त केला होता. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे (United Nation) यासंदर्भात तक्रार केली आहे. क्षेपणास्त्र प्रकरणाची संयुक्त चौकशी (Joint Inquiry) करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. (IND vs PAK)

 

भारतीय क्षेपणास्त्र तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्यानंतर पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्याची तयारी (Preparing to Reply) केली होती. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान तितक्याच क्षमतेचे क्षेपणास्त्र डागणार होता. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्याची माहिती प्राथमिक तपासातून (Preliminary Investigation) समोर आली. त्यामुळे पाकिस्तानने भारतावर क्षेपणास्त्र डागण्याचा निर्णय रद्द केला. (IND vs PAK)

 

भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र डागलं जाणार होतं. भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान ही कारवाई करणार होता. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे हे क्षेपणास्त्र कोसळल्याचे संकेत तपासातून समोर आले. यानंतर पाकिस्तानने आपला निर्णय बदलला आणि पुढील अनर्थ टळला. याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

 

भारताचे एक क्षेपणास्त्र 9 मार्च रोजी पाकिस्तानच्या मियां चन्नू (Miya Channu) भागात कोसळलं.
यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु काही रहिवासी इमारतींचं नुकसान झालं.
भारताने या घटनेबाबत खेद व्यक्त केला. नियमित देखभाल केली जात असताना चुकून क्षेपणास्त्र डागलं गेल्याचे भारताकडून सांगण्यात आले. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समितीची स्थापना (Establishment High Level Committee) केली आहे.

 

Web Title :- IND vs PAK | pakistan was to fire missile in response of india missile crashed in pakistan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा