home page top 1

‘भारत-पाक’मध्ये सोशल ‘वॉर’ ; ‘मौका मौका’ची ‘ही’ नवी जाहिरात पाहिलीत का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामान होणार आहे. त्या अगोदर सोशल मीडियावर दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडले गेले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीने एक  जाहिरात तयार करण्यात आली असून यात अभिनंदन सारख्या मिश्या आणि त्याच्यासारखीच बोलण्याची शैली या मॉडेलने पकडली असल्याचे या जाहिरातीत दिसून आले होते. संपूर्ण देशभरातून या जाहिरातीवर टीका करण्यात आल्यानंतर  आता स्टार स्पोर्ट्स या क्रीडावाहीनीने नवीन जहिरात आणून पाकिस्तानच्या या जाहिरातीला त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आहे.


स्टार स्पोर्ट्स या क्रीडा वाहिनीने हाच धागा पकडत ‘मौका मौका’ जाहिरातीमधून पाकिस्तानला लक्ष्य करण्यात आले आहे. आजपर्यंत पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही, त्याचाच विचार करून या क्रीडा वाहिनीने ‘मौका मौका’ या सिरीजमध्ये  या जाहिराती तयार केल्या आहेत.

पाकिस्तानने तयार केलेल्या जहिरातीत भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याची खिल्ली उडवण्यात आली होती, त्याचा बदला म्हणून या वाहिनीने हि जाहिरात काढत  पाकिस्तानची चांगलीच हवा टाईट केली आहे.

दरम्यान, १६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात हा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने क्रीडा रसिक आणि भारतीय पाठीराखे  चिंतेत आहेत. त्यामुळे सगळ्यांचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

पाणी आणि मिठाने दूर करा ‘या’ १० सौंदर्य समस्या

शाकाहारी पुरुष पार्टनरला करतात पूर्ण संतुष्ट

जंक फूड महिलांच्या आरोग्यासाठी घातक

तुमच्या मनातही आहेत का ? रक्तदानाविषयी हे ‘गैरसमज’

Loading...
You might also like