IND vs SA 2nd ODI | द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ‘हा’ खेळाडू घेणार दीपक चहरची जागा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – IND vs SA 2nd ODI | भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) याला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय वरिष्ठ निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) उर्वरित वनडे मालिकेसाठी (IND vs SA 2nd ODI) दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याची निवड केली आहे. दीपक चहर आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (National Cricket Academy) दाखल होणार आहे. तेथील वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवणार आहे अशी माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.

 

वॉशिंग्टन सुंदरने भारताकडून शेवटचा सामना फेब्रुवारीमध्ये खेळला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) त्या वनडे सामन्यात त्याने 4 षटके गोलंदाजी मात्र त्याला त्यामध्ये एकही विकेट मिळाली नाही. तसेच वॉशिंग्टन सुंदरने भारताकडून आतापर्यंत 4 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याला 5 विकेट्स मिळाले आहेत. तसेच 4 कसोटी सामन्यामध्ये 6 विकेट्स घेत 265 धावा केल्या आहेत. याबरोबर त्याने भारताकडून 21 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 25 विकेट्स घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी भारताचा वनडे संघ :
शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार,
राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर,
कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर.

 

Web Title :- IND vs SA 2nd ODI | washington sunder replaces deepak chahar in odi squad for series against south africa Sport news

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले, राष्ट्रवादी व्यावसायिक पक्ष, शिवसेनेला पद्धतशीरपणे…

Kalyan Crime | मित्राने आधी घरी बोलवून मित्राला दिली मटण अन् दारुची पार्टी, त्यानंतर…., कल्याणमधील धक्कादायक प्रकार

T20 World Cup 2022 | जसप्रीत बुमराहची जागा घेणार मोहम्मद शमी, 2-3 दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना